Scholership esakal
नाशिक

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परदेश शिष्यवृत्तीसाठी मागविले अर्ज

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हे अर्ज मागविले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हे अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज भरून आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ८ जुलैपर्यंत मुदत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. टाइम्‍स हायर एज्‍युकेशन किंवा क्‍यूएस क्रमवारीत दोनशेच्‍या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. कला, वाणिज्‍य, विज्ञान, व्‍यवस्‍थापन, विधी, औषधनिर्माणशास्‍त्र या शाखांसाठी पदव्‍युत्तर पदविका व पदव्‍युत्तर पदवी आणि डॉक्‍टरेटसाठी प्रत्‍येकी एक, अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रत्‍येकी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. अभियांत्रिकी/वास्‍तुकला शास्‍त्र शिक्षणक्रमासाठी एकूण आठ विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ दिला जाईल. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT