Kapaleshwar Mandir  esakal
नाशिक

Kapaleshwar Mandir : श्री कपालेश्‍वर देवस्थानच्या 7 नव्या विश्‍वस्तांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

Kapaleshwar Mandir : रामतीर्थाजवळील प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या जुन्या विश्‍वस्तांची मुदत संपल्याने धर्मदाय सहआयुक्तांनी निवड प्रक्रिया राबवत नव्याने सातजणांची विश्‍वस्त म्हणून नियुक्ती केली. (Appointment of seven new trustees of Shree Kapaleshwar Devasthan nashik news)

लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्‍वर महादेव देवस्थानावर २००४ मध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली सात विश्‍वस्तांकडे देवस्थानचा कारभार सोपविण्यात आला होता. ट्रस्टसाठी घटना असावी, असा आग्रह धरण्यात आला होता.

यासाठी कायदेशीर विश्‍वस्तांनी नियुक्ती करावी, असा अर्ज तत्कालीन विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी संबंधितांकडे धरला होता. त्यानुसार विश्‍वस्तपदासाठी राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत ५४ जणांनी अर्ज दाखल केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी त्यातील मंडलेश्‍वर काळे, श्रीकांत राठी, सुनील पटेल, अक्षय कलंत्री, रावसाहेब कोशिरे, प्रशांत जाधव व श्रद्धा कोतवाल या सातजणांची पुढील दोन वर्षांसाठी विश्‍वस्त म्हणून नियुक्ती केली. आता नवीन घटना व ट्रस्टचा कारभार पारदर्शकपणे करण्याचे आव्हान नव्या विश्‍वस्त मंडळापुढे राहणार आहे.

दरम्यान कपालेश्‍वर देवस्थानच्या कलशाकडील भागाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असे देवस्थानतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्थ; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Google वर ‘Punch the Monkey’ सर्च केलंत का? क्यूट सरप्राइज पाहून हसू आवरणार नाही

Latest Marathi News Live Update : जालन्यात 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT