Dangerous arch
Dangerous arch esakal
नाशिक

Nashik : नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या कमानीस काही महिन्यातच गळती

- युनूस शेख

जुने नाशिक : नगरसेवक निधीतून (corporators fund) पिंझारघाट येथे भव्य अशी कमान (Arch) उभारली आहे. ठेकेदारामार्फत अतिशय निकृष्ट प्रतीचे काम केले असल्याने काही महिन्यातच कमानीस गळती लागली आहे. त्यामुळे वारंवार पावसाचे पाणी (Rain) गळत असलेला भाग खचून अपघात होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमानीची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी करत आहे. (arch leakage from corporator fund leaked within few months Nashik Latest News)

पिंझारघाट चौफुलीकडून सर्वधर्मीय श्रद्धास्थान बडी दर्गाकडे येणाऱ्या मार्गावर स्थानिक नगरसेवकांनी निधीतून काही महिन्यांपूर्वी भव्य कमान उभारली आहे. धार्मिक स्थळाचा विकास संकल्पनेतून कमान उभारली होती. ठेकेदाराकडून मात्र अतिशय निकृष्ट प्रतीचे काम केले असल्याचे प्रत्यक्षात बघावयास मिळत आहे. सध्या कमानीचा काही भाग धोकादायक झाल्याची तक्रार नागरिक करीत आहे. पहिल्याच पावसाने कमानींच्या कामाचा दर्जा स्पष्ट झाला. कमानींच्या दर्शनी भागात बडी दर्गा बाबांचे नाव लावण्यात आले आहे. त्यास चारही बाजूने संगमरवरी फरशीची चौकट बनवली आहे.

कमानींच्या वरील भागात पावसाचे पाणी साचून त्या चौकटीतून खाली गळत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याने चौकटीचे सिमेंट धुऊन जाऊन चौकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या संततधार पाऊस असल्याने थोड्या फार प्रमाणात पाण्याची गळती लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास ती चौकट कधीही कोसळण्याची शक्यता आहे. काही महिन्यातच अशाप्रकारे दुरवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

"कमानीचे काम निकृष्ट प्रतीचे करण्यात आले आहे. कमानींच्या चौकटीतून सतत पाणी गळत असल्याने तो भाग धोकादायक झाला आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये. यासाठी त्वरित त्याची दुरुस्ती करण्यात यावी." - जावेद शेख, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT