नाशिक : (बागलाण) मुंजवाड, खमताणे शिवारात गेल्या महिनाभरापासून त्याने धुमाकुळ घातला आहे. त्याच्या दहशतीमुळे घराबाहेर निघणे देखील मुश्किल झाले असून वनविभागाच्या पिंजर्याला हुलकावणी देत बिबट्याकडुन इतरत्र भटक्या प्राण्यांचा फडशा पाडण्याचे सत्र सुरू आहे. यामुळे शेत शिवारात राहणाऱ्या ग्रामस्थां मध्ये दहशतीचे वातावरण असुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे .
अंधार पडताच सर्वत्र अघोषित संचारबंदी लागू
शहरापासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर मुंजवाडच्या मल्हारवाडी परिसरात जवळपास महिन्याभरापुर्वी बिबट्याने भरदिवसा सहकुटुंब दर्शन दिले. यावेळी बिबट्याने केदा गीते या शेतकऱ्यावर थेट हल्ला केल्याने ते जखमी झाले. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने वनविभागाकडुन पिंजरा लावण्यात आला. परंतु, बिबट्याने त्याऐवजी बंजरगवाडी, वेताळवाडी खमताणे शिवार परिसराकडे मोर्चा वळवला. याठिकाणी देवराव खैरनार याच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना बिबट्याने दर्शन दिले. तत्पूर्वी त्याने संजय वासोळकर यांच्या युवा शेतकर्यावर आपला जीव वाचवला त्यामुळे पिंजरा या परिसरात हलविण्यात आला. परंतु, अद्यापही बिबट्या पिंजऱ्यात येऊ शकलेला नाही. परिसरात दररोज एक नव्हे तर तीन ते चार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने अंधार पडताच सर्वत्र अघोषित संचारबंदी लागू होते. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीचे पिकांना पाणी देणेही अशक्य ठरले असुन शेतपिकांचे नुकसान होत आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वनविभागाकडुन परिसरात पिंजरा लावला असला तर त्याची नीट स्वच्छता केली जात नाही. वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांकडून
माहिती घेत कार्यवाही करण्याची गरज आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असुन दोन जणांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने वनविभागाने अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच अपेक्षित कारवाई करावी. - शैलेश सुर्यवंशी, माजी जि. प. सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.