Anand Ambekar in red circle and Late anand ingale esakal
नाशिक

Nashik Crime: दारुड्यांमध्ये वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात टाकली फरशी; जखमीचा मृत्यु, आरोपी ताब्यात

सिडको परिसरातील कामाठवाडे गावानजिक स्व.मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघा मित्रांच्या शुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले अन...

सकाळ वृत्तसेवा

सिडको : सिडको परिसरातील कामाठवाडे गावानजिक स्व.मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघा मित्रांच्या शुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी दुभाजकात पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून ३२ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. (Argument between drunkard one threw stone other head Injured died accused in custody Nashik Crime)

याबाबत अधीक माहिती अशी की मयत आनंद इंगळे (३२, कामाठवाडे) व संशयित आनंद आंबेकर (२८, कामाठवाडे ) हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौक परिसरात एका हॉटेल मध्ये मद्यपान करीत असतांना तेथेच त्यांच्यात झालेल्या शुल्लक कारणाच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतरही ते दोघे कामाठवाडे गाव परिसरानजीक आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यावेळी संशयित आनंद आंबेकर याने मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकर याने दुभाजाकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घातले. यावेळी येथील काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केले.

तर गंभीर जखमी असलेल्या आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असतांना आनंद इंगळे मयत झाल्याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मयत आनंद इंगळे याच्या पश्यात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे.

संशयितावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आनंद आंबेकर यास तात्काळ अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिमंडळ दोनच्या पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वसंत खतेले, नाईद शेख, योगेश शिरसाठ आदिनसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT