Army recruitment using bogus documents suspect arrested  esakal
नाशिक

बनावट कागदपत्रांद्वारे लाखाे रुपये घेऊन लष्कर भरती करणारे गजाआड

विनोद बेदरकर

नाशिक : उमेदवारांकडून लाखाे रुपये घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करण्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगर येथे उघडकीस आला हाेता. त्यात लष्कराने नगर गुन्हे शाखेच्या मदतीने सहा जणांच्या रॅकेटचा पदार्फाश करून अटक केली हाेती. आता पुन्हा पथकाने वाडीवाऱ्हे परिसरात कारवाई करून रॅकेटमधील आणखी एकाला अटक केली आहे. अजय ऊर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या नव्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे.

नाशिक रोडच्या तोफखाना केंद्रात लष्कर भरतीत उमेदवारांचे वय कमी दाखवून त्यासाठी बोगस प्रमाणपत्र मिळवून देत भरती केली जाते, अशी माहिती मिळाल्यावरून लष्करी यंत्रणा काही दिवसांपासून या प्रकरणावर पाळत ठेऊन होती. त्यानुसार तोफखाना केंद्रातील गुप्तचर विभागाने नगर गुन्हे शाखेच्या मदतीने मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२, रा. जांभळी, पाथर्डी), दत्तू नवनाथ गर्जे (४०, अकोला पाथर्डी), कुंडलिंक दगडू जायभाये (अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मच्छिंद्र कदम (मानूर, ता. शिरुर कासार, जि. बीड), शांताराम पंढरीनाथ अनार्थे (पिंपळद, जि. नाशिक) यांना ताब्यात घेतले हाेते. मात्र, अजय टिळे फरारी हाेता. ताे वाडीवाऱ्हे येथील घरी आल्याची माहिती नगर गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पथकाने त्याला अटक केली.

प्रकरणाच्या चौकशीत (पाथर्डी, जि. नगर) येथे रॅकेट असल्याचे पुढे आले. बनावट संस्थेच्या नावाने दाखले देणाऱ्या रॅकेटने काहींकडून ३५ हजार रुपये घेऊन मुलांना इयत्ता दहावीच्या वर्गात बाह्य विद्यार्थी म्हणून प्रवेश देत बनावट कागदपत्रे, दाखले दिल्याची माहिती पुढे आली आहे.

मुद्देमाल हस्तगत

अटकेतील पाच जणांकडून वेगवेगळ्या शाळेचे दाखले, दाखले तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे बनावट स्टॅम्प, संगणक, स्कॅनर मशीन, आधार कार्ड बनविण्याची सामग्री यापूर्वीच जप्त केली असून, या रॅकेटमध्ये नाशिकमधून तिसरी अटक आहे. पाथर्डीचे पाेलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे यांच्या पथकासह मिलिटरी इंटेलिजन्स साऊथ कमांडने ही संयुक्त कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT