नाशिक

Nashik MD Drug Case : छोट्या भाभीला ‘एमडी’ पुरविणाऱ्यास ठाण्यात अटक; ठाण्यातून नाशिकला पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : वडाळा गावातील एमडी ड्रग्ज प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाण्यातून आणखी एकाला अटक केली.

छोट्या भाभीला ठाण्यातून एमडी ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे यातून समोर आले आहे. (Arrested in Thane for providing md to chhoti bhabhi nashik crime news)

सलमान (पूर्ण नाव नाही) असे ठाण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. वडाळा गावात ८ ऑक्टोबरला शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून एमडी ड्रग्जविरोधात कारवाई केली होती.

पथकाने आतापर्यंतच्या कारवाईत संशयित छोटी भाभी ऊर्फ नसरिन इम्तियाज शेख, तिचा पती इम्तियाज ऊर्फ राजा उमर शेख, वसिम रफिक शेख या तिघांना अटक केली आहे.

सदरील गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित छोट्या भाभीला तिचा पती इम्तियाज शेख हा ठाण्यात एमडी ड्रग्ज आणून देत असल्याचे निष्पन्न झाले होते; परंतु तो ठाण्यातून कोणाकडून आणत होता, याचा तपास करीत असताना अमली पदार्थविरोधी पथकाने ठाण्यात सलमान या संशयिताला अटक केली आहे.

सलमानकडून इम्तियाज एमडी ड्रग्ज आणत असल्याचे तपासातून निष्पन्न होताच त्यास अटक केली. या प्रकरणातील सलमान चौथा संशयित आहे. सलमान कोणाकडून एमडी ड्रग्ज खरेदी करीत होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

बाबो! अक्षय खन्नाने मुंबईत घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं आलिशान घर; मलबार हिलमधील अपार्टमेंटची खासियत काय?

Asian Games, Archery: साताऱ्याच्या साहिलने चिकितासह जिंकलं गोल्ड मेडल! तिरंदाजीत भारताला दोन तासात दुसरं सुवर्णपदक

Rabi Crop Target:पेरणीखालील क्षेत्र घटले; खरीप हंगामात पीक उत्पादनात घट नाही

Latest Marathi News Live Update : मुंबईत मोठी कारवाई; अरबी सागरातून ३ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT