On the occasion of Kojagari Purnima, the Kavad holders came from Nandurbar, Sakri, Pimpalner esakal
नाशिक

Malegaon : कोजागिरी निमित्त कावडधारकांचे आगमन, सामाजिक एकतेची परंपरा!

सकाळ वृत्तसेवा

अभोणा : कोजागरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांपैकी असलेले आद्यशक्तीपीठ श्री सप्तशृंगगड येथील कावडयात्रेसाठी धुळे, पिंपळनेर, साक्री, नंदुरबार परिसरातील कावडधारकांचे अभोणा येथे उत्साहात आगमन झाले.

शेकडो मैल पायी प्रवास करून आलेल्या कावडधारकांना सेवा देण्याचे व्रत गेल्या अनेक वर्षांपासून येथील हनुमान गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पार पाडले जात आहे. दरवर्षी कावडधारकांचा मुक्काम अभोणा येथे असतो. यंदा कावडधारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. (Arrival of Kawad Dhari on occasion of Kojagiri Purnima malegaon news)

त्यांच्या भोजनाची, पाणी व निवासाची व्यवस्था हनुमान गणेश मंडळ व अभोणा ग्रामस्थ दरवर्षी स्वयंस्फूर्तीने करीत असतात. साक्री, पिंपळनेर, नंदुरबार परिसरातील जवळपास दोन हजार ते पंचवीसशे कावडधारक आपापल्या परिसरातील नद्यांमधील जल जमा करून कोजागरी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री सप्तश्रृंगी देवीला या जलाने अभिषेक करण्यासाठी पायी प्रवास करीत येतात.

ही परंपरा फार जुन्या काळापासून चालत आली आहे. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सर्व कावडधारक अभोणा येथे मुक्कामास थांबतात. गावातील सर्व जाती- धर्माचे तरुण, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रात कार्यरत असणारे नोकरदार, व्यापारी, विविध मंडळाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कावडधारकांची सेवा करीत असतात.

हा उत्सव म्हणजे ग्रामस्थांसाठी एकतेचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव असतो. दरवर्षी वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी यानिमित्ताने कावडधारकांना दिली जाते. सायंकाळी ग्रामपालिका चौकात पुर्णतः भक्तिमय वातावरण असते. रात्री उशिरापर्यंत कावडधारकांकडून देवी मातेचा जयघोष करून जागर- भक्ती गोंधळ घातला जातो.

पहाटेला कावडधारकांचे श्री सप्तश्रृंगी गडाकडे प्रस्थान होते. गावातील हनुमान गणेश मंडळ, विविध गणेश मित्र मंडळ, अध्यात्मिक मंडळ तसेच विविध सामाजिक मंडळ, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत कर्मचारी स्वयंस्फूर्तीने स्वयंपाक, भोजन वाढणे, पाणी वाटप व स्वच्छतेची कामे करीत असतात. हा उत्सव म्हणजे गावाच्या एकतेचे प्रतीक मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT