Santhosh Kokane, in-charge center head Vijay Pagare, principal Balkisan Darane etc. while welcoming the newly admitted newcomers in a bullock cart. esakal
नाशिक

School Start: नवागतांचे रथ अन्‌ बैलगाडीतून आगमन! इगतपूरीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम

विजय पगारे

School Start : इगतपुरी शहरासह तालुक्यात शाळेचा पहिला दिवस, पुस्तकदिन, नवागतांचे स्वागत व इतर सहशालेय उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तालुक्यातील २२२ प्राथामिक, ६४ माध्यमिक व ३९ खासगी अशा एकुण ३२६ शाळांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी दिली. (Arrival of newcomers student in bullock carts Various programs for students in schools in Igatpuri nashik news)

बोरटेंभे येथे प्रभातफेरी

बोरटेंभे येथील प्राथमिक शाळेतर्फे स्कूल चले हम, सब बढे- सब पढे अशा घोषणा देत गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली. वाजतगाजत निघालेल्या प्रभात फेरीने ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र आडोळे यांच्या प्रमुख उपास्थितीत झालेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक किशोर पाटील, जनार्दन कडवे, माणिक भालेराव आदींसह शिक्षक उपस्थित होते.

त्रिंगलवाडीत प्रवेशाचा उत्साह

अत्यंत दुर्गम व आदीवासी भागातील त्रिंगलवाडी येथील प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रभारी केंद्रप्रमुख विजय पगारे यांनी पटनोंदणी पंधरवड्याचे महत्व विशद केले. नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोकणे, ज्ञानेश्‍वर मुसळे, सुरेश कोकणे, शांताराम शेलार, ताराबाई अस्वले, अलका काठे, मनोज पवार, शिवाजी शेवाळे, जितेंद्र भदाणे, शिवराम मेमाणे, धोंडु रोंगटे, उज्वला वडगे, रत्ना खाडे, सुनिता जगताप, शोभा चव्हाण, अंगणवाडी सेविका आशा वाणी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जामुंडेत शाळा प्रवेशोत्सव

जामुंडे येथेही प्रवेशाचा उत्सव व स्वागत समारंभ उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापक अनिल शिरसाट, अमोल बावा, निशांत पगार, सविता गोसावी, संतु डोके, भाऊ भले, बाळू भगत, लिलाबाई डोके यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

केंद्रशाळा घोटी मुले नं १

जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त प्रवेशदिंडी, नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तक व मोफत गणवेशांचे वाटप करण्यात आले.

शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भागडे, मुख्याध्यापक जहिर देशमुख, पदवीधर शिक्षक उत्तम भवारी, गोरख खतेले, प्रशांत वाघ, नितीन गुरव, दिपिका ठाकरे, वैशाली जगताप, अंजना कोकणी, गोरक्षनाथ नरोडे यांच्यासह माता, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT