This social short film has been selected in the 'Dhaka International Short Film Festival' in Asia. esakal
नाशिक

Dhaka Short Film Festival: जागतिक स्तरावर लखलखतोय ‘आरसा’; ढाका आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये निवड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कर्करोगाविषयक सामाजिक प्रबोधनात्मक निर्मिती केलेल्या ‘आरसा’ या सामाजिक लघुपटाची आशिया खंडातील ‘ढाका आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल’ मध्ये निवड झाली आहे.

आशिष निनगुरकर लिखित, गणेश मोडक दिग्दर्शित कर्करोगाबद्दल जनजागृती करणाऱ्या ‘आरसा’ या लघुपटाला सर्वच फेस्टिवलमध्ये परीक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. (Arsa shining globally Selection in Dhaka International Short Film Festival nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

‘आरसा’ ही एका मुलीची गोष्ट आहे. ‘जगात जर आरसे नसते, तर काय बिघडले असते. माणसाचे डोळेच जर स्वच्छ लखलखीत असले असते. तर त्याच्या आत त्याला डोकावता आले असते. असा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवून एकूण ११७ पुरस्कार मिळवले आहेत. लघुपटाचे संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप, गीतांजली कांबळी, डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका केल्या आहेत.

'काव्या ड्रीम मूव्हीज’ व किरण निनगुरकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. लघुपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतीश सोनवणे, स्वप्नील निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू, अभिषेक लगस, सुनील जाधव, अजित वसंत पवार यांनी काम केले. तर या लघुपटाचे सहनिर्माते अशोक कुंदप, आशा कुंदप हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT