Asha and group promoters protested at the entrance of the Zilla Parishad on Monday for various pending demands including no compulsion for online work. esakal
नाशिक

Nashik Protest News: अल्पशिक्षित आशा व गटप्रवर्तकांवर दबावाच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेवर मोर्चा व ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाइन कामासाठी दबाव आणला जातो आहे. बहुसंख्या आशा अल्पशिक्षित असल्याने आरोग्य विभागातील इंग्रजी अॅपवर काम करता येत नाही.

त्यामुळे त्यांना ऑनलाइन कामे सांगणे बंद करावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक संघटना, आयटकतर्फे सोमवारी (ता.१६) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. (Asha and group promoters protest at Zilla Parishad for various pending demands nashik news)

प्रवेशव्दाराबाहेर आंदोलकांनी तब्बल दोन तास ठिय्या मांडला होता. दोन दिवसात यावर तोडगा न निघाल्यास बुधवारपासून (ता.१८) कामबंद आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये अठरा वर्षापासून कार्यरत गट प्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तो मिळेपर्यंत गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या, सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन द्या, आशांना ऑनलाइन कामासाठी दबाव आणला जातो आहे, तो त्वरित थांबवावा, ऑनलाइन कामे आशा करणार नाहीत, बहुसंख्य आशा अल्पशिक्षित आहेत, त्यांना आरोग्य विभागातील इंग्रजीत असलेल्या ॲपवर काम करता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन कामे सांगणे बंद करावे, दिवाळी भाऊबीज लागू करावी आदी मागण्य़ा प्रलंबित आहेत.

या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. भालेकर हायस्कूलपासून जिल्हा परिषदेपर्यंत हा मोर्चा निघाला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावरच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. आशांना ऑनलाईन काम देणे बंद करा, हम सब एक है, आशा, गटप्रवर्तक एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

आंदोलनकर्त्यांतर्फे आशा कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने श्रीमती मित्तल यांना मागण्यांचे निवेदन दिले. प्राजक्ता कापडणे, सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, माया घोलप, रूपाली सानप, बेबी धात्रक, अर्चना गडाख, मनीषा खैरनार, सुनीता गांगुर्डे, सुरेखा खैरनार, सुनंदा परदेशी, समिरा शेख, जयश्री गोलनिस, सुवर्णा बैरागी, वैशाली कवडे, सुनंदा परदेशी आदींसह गटप्रवर्तक आणि आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

वाहतूक व्यवस्थेवर ताण

गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या मोर्चा आणि ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा परिषद रस्ता बंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीवर काहीसा ताण आला. पोलिसांनी त्र्यंबक नाका ते गंजमाळ सिग्नल रस्ता बंद केला.. या आंदोलनाचा फटका बांधकाम विभाग तीनच्या कार्यकारी अभियंत्यांच्या वाहनाला देखील बसला. त्यांचे वाहन आंदोलकांच्या गराड्यात अडकले.

कार्यकारी अभियंत्यांच्या मनमानीमुळे कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये वादंग झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT