Vitthal Mandir The appearance of the Yatra in the Mandir area esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi 2023: भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद! 'हरी विठ्ठला'च्या नामघोषने दुमदुमलं प्रती पंढरपूर

रवींद्र पगार

Ashadhi Ekadashi 2023 : ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल......च्या गजराने कळवण नागरी दुमदुमून गेली.

प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या भागातून पंढरपूर जाण्याचं शक्य नसल्याने भक्तांनी विठुरायाचे दर्शन व्हावे या भावसागरात बुडवून कळवण गावात दिंड्या प्रवेश करताच पंढरीत आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

“भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंद" अशी अवस्था विठ्ठल भक्तांची झाली होती. (Ashadhi Ekadashi 2023 city of Kalvan shook with devotees slogan of Hari Vitthala nashik)

कळवण शहरातील पंचवटी म्हणून ओळखल्या गांधी चौकात वैष्णवांचा मेळा भरल्याने या परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.

प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या कळवण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी तालुक्यासह कसमादे परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.‌

पहाटे मंदिराचे मुख्य पुजारी नंदकिशोर चंद्रात्रे,मुंकंद चंद्रात्रे,नंदन चंद्रात्रे मंत्रपुष्पांजली ने आजचे पूजेचे मानकरी संतु रामकृष्ण ताकाटे ,सचिन संतु ताकाटे राहुल संतु ताकाटे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. कळवण शहरातील पंचवटी म्हणून ओळखल्या गांधी चौकात वैष्णवांचा मेळा भरल्याने या परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.

कळवणसह तालुक्यातील तसेच देवळा,सटाणा, मालेगाव, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील बरोबरच कळवण तालुक्यातील मानूर पाळे, इन्सी, नरुळ, मेहदर, ओतूर, सुकापूर, रवळजी, भेंडी बगडू, रवळजी परिसरातून विठ्ठल, रुक्मिणीच्या भाविकांच्या दिंड्या आल्या होत्या.मंदिर व्यवस्थापनाने वतीने आलेल्या दिंड्या स्वागत करण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळी कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघ आ. नितीन पवार यांनी भेट देवून दर्शन घेतले समितीच्या वतीने आ.नितीन पवार यांच्या सत्कार करण्यात आला.

सर्वत्र विठू नामाचा जयघोष सुरु होता. यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचे मानकरी ताकाटे यांच्या कडून साबुदाणा खिचडी, केळी, चहा, राजगिरा लाडु आदींचे वाटप करण्यात आले. रात्री (दि १० जुलै) ९ वाजता ह. भ. प. नितीन महाराज मुडावदकर यांचे जाहीर कीतर्नाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व भाविक मोठ्या संख्येने भाविक नागरिक उपस्थित होते. मंदिर परिसरात कळवण पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT