Ashadhi Wari 2023 esakal
नाशिक

Ashadhi Wari: वारकऱ्यांच्या मदतीला धावणारे सेवाभावी हात! निवासापासून भोजनापर्यंत सर्व नियोजन स्थानिकांकडून

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी नगर जिल्ह्यातील घोगरगाव येथे काल मुक्कामी होती. नगरचा संत निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा आटोपून वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

जसजसे पंढरपूरचा मार्ग जवळ येत आहे, तसतशी वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. आता तर संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यानेही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

त्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला अधिकच उधाण आले आहे. (Ashadhi Wari 2023 Charitable hands sant nivruttinath maharaj palakhi from accommodation to food service by locals nashik news)

पालखीसाठी राबणारे हात या मालिकेत निवृत्तिनाथांच्या पालखीच्या मुक्कामाची जी ठिकाणे आहेत. तेथील सेवाभावी माणसे अर्थातच वारकरी संप्रदायावर प्रेम असणारी ही माणसे एका अर्थाने पालखीतील वारकऱ्यांसाठी राबत आहेत.

निवृत्तिनाथांची पायी पालखी त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरला पोचेपर्यंत साधारणपणे २५ मुक्काम होतात. या मुक्कामाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांची महाप्रसादाची व्यवस्था करणे म्हणजे मोठे अवघड काम आहे.

मात्र कितीही वारकरी असले तरीही ज्या, ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या त्या ठिकाणी त्या त्या गावची माणसं अगदी आनंदाने वारकऱ्यांच्या सेवेत रुजू होतात. हजारोंच्या संख्येने असलेल्या वारकऱ्यांना सेवा सुविधेमध्ये, काहीही कमतरता जाणवत नाही.

ही परंपरा आजकालची नाही तर अनेक वर्ष सातत्याने वारकऱ्यांना ही माणसं सेवा देत आहेत. ज्या दिवशी गावामध्ये पालखीचा मुक्काम असेल त्या दिवसापासून साधारणपणे पंधरा दिवस अगोदर वारकऱ्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंत सर्व नियोजन स्थानिक ग्रामस्थांकडून केले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्या गावात पालखी येणार आहे, तेथील ग्रामस्थ पालखीच्या स्वागतासाठी तयार असतात अनेक ठिकाणी स्वतंत्र बँड पथक लावून पालखीचे स्वागत केले जाते काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक असते.

या सर्व गोष्टींचे नियोजन काही दिवस अगोदरच करावे लागते. मुक्कामाच्या ठिकाणांबरोबरच काही विश्रांतीची ठिकाण आहे. त्याही ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था काही सेवाभावी मंडळी करत असतात तेही ठिकाणी अर्थातच ठरलेली आहेत.

त्यांचेही मोठे नियोजन असते. मुक्कामाच्या ठिकाणांना निवृत्तीनाथ संस्थांतील विश्वस्त मंडळदेखील काही दिवस अगोदर भेट देत असते. पाहणी दौरा करत असते.

अर्थात या वेळी तो अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने झालेला असल्याने कोणतीही अडचण पालखी सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत निर्माण झाली नाही ही आनंदाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT