ashadhi wari 2023 sant nivruttinath palkhi rain showers on nivruttinath maharaj paduka nashik news
ashadhi wari 2023 sant nivruttinath palkhi rain showers on nivruttinath maharaj paduka nashik news esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : संत निवृत्तिनाथांच्या पादुकांवर पावसाचा जलाभिषेक; भाविकांचा उत्साह द्विगुणित!

ज्ञानेश्वर गुळवे

Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीसह दिंडी सोहळा पंढरपूर वारी पायी मार्गात असताना शनिवारी (ता. २४) सोलापूर जिल्ह्यातील दगडी अकोला येथे असताना रिमझिम पावसाच्या सरींचा जलाभिषेक संत निवृत्तिनाथांच्या पादुकांवर झाला.

उष्णतेने त्रस्त झालेल्या वारकऱ्यांना पावसाच्या शिडकाव्याने पायी वाटचालीत अधिक उत्साह आला. (ashadhi wari 2023 sant nivruttinath palkhi rain showers on nivruttinath maharaj paduka nashik news)

वारकऱ्यांना पावसाच्या रिमझिम सरीतच रेनकोटचे वाटप करण्यात आले. निवृत्तिनाथ संस्थानचे पदाधिकारी ॲड. नीलेश गाढवे पाटील, नारायण मुठाळ, सोमनाथ घोटेकर, अमर ठोंबरे, कांचन जगताप या विश्वस्तांच्या उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप झाले.

वेणेगाव (ता. माढा) येथून वरुणराजाने संत निवृत्तिनाथांच्या पादुकांवर जलाभिषेक केला. पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत वारकरी ज्ञानोबा, माउली, तुकाराम, निवृत्तीराया असा नामघोष करत आनंदून गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वरुणराजाच्या साक्षीने पालखी हळूहळू वेणेगाव येथून दगडी अकोल्याकडे मार्गस्थ झाली. या वेळी दगडी अकोला येथे ग्रामस्थांनी संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे मनोभावे स्वागत करून आतषबाजीत तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात भरपावसात स्वागत केले.

वेणेगाव येथे काही काळ पालखी विसावल्यानंतर वारकऱ्यांना पावसाच्या रिमझिम सरीतच प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोटचे वाटप करण्यात आले. निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, सचिव सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे, विश्वस्त कांचन जगताप आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT