road built on Dattamandir Road month ago has been demolished Latest Marathi News esakal
नाशिक

नाशिक : महिनाभरातच डांबरीकरण केलेला उद्‌ध्वस्त

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : महिनाभरापूर्वी केलेला दत्तमंदिर रोड परिसरातील रस्ता पावसामुळे (Heavy rain) उद्‌ध्वस्त झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरात असे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. दत्तमंदिर रोड परिसरात महिनाभरापूर्वी विकासकामांचे डांबर (Asphalt) पडले होते. (Asphalted road on dattamandir demolished within month Nashik Latest Marathi News)

या रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्ता जैसे थे झाला आहे. या संदर्भात ठेकेदाराने गुणवत्तेने काम केले नसल्याचा आरोप सध्या नागरिक करीत आहे. नाशिक रोडमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी केला आहे.

परिसरात सध्या गुणवत्ता नियंत्रणावर भरच दिला जात नसल्याचा आरोप होत आहे. दीड दोन महिन्यापूर्वी केलेल्या अनेक रस्ते खचले आहेत. याची देयके ठेकेदाराला देण्यात आलेली आहे, मात्र पक्के काम झालेले नाही. परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची नियमबाह्य कामे झाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही नगरसेवकांनी विशिष्ट ठिकाणचे कागदावर दाखवलेल्या रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण दुसऱ्या परिसरात केले आहे.

विशेष करून प्रभाग वीसमध्ये प्रधाननगर, सद्गुरुनगर, पाटोळे मळा, मनोहर गार्डनचा काही परिसर, लोणकर मळा, कमला पार्क या ठिकाणी मंजूर झालेल्या कामाची देयके अदा केलेली असून त्याऐवजी पेंढारकर कॉलनी गंधर्व नगरी साने गुरुजी नगर या भागात रस्त्याची कामे करण्यात आलेली आहे. प्रभागात विकासाचा समतोल राखलेला नाही. रस्त्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांसह भाजप मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी केला आहे.

"उपअभियंता नीलेश साळी यांनी वरिष्ठ नगरसेवकांची संगनमत करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्ते कामत भ्रष्टाचार केला आहे. रस्त्याच्या कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रण नाही. काही नगरसेवकांच्या मर्जीने प्रभागातील कामे झालेली असून, यासंदर्भात अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत." - हेमंत गायकवाड ,नाशिक रोड मंडल अध्यक्ष.

"दत्तमंदिर रोड रस्त्याच्या कामासंदर्भात ठेकेदाराला नोटीस दिलेली आहे. यासंदर्भात त्याला पुन्हा रस्त्याचे काम करायला लावणार आहे. काही ठिकाणची राहिलेली कामे पावसाळा झाल्यावर पूर्ण करणार आहे. भ्रष्टाचार अजिबात झालेला नाही." - नीलेश साळी, उपअभियंता बांधकाम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT