Anup Khairnar, the driver of Kalavan Agar, who was injured in the attack by the youth at wani
Anup Khairnar, the driver of Kalavan Agar, who was injured in the attack by the youth at wani esakal
नाशिक

Nashik Crime News : कार चालकाकडून बसचालकावर हल्ला; चालक, वाहक जखमी

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : कारला कट मारल्याची कुरापत काढून बसचालकावर स्विप्ट कारचालकाने धारदार शस्त्राने वार केला. कळवण आगाराचे बसचालक व वाहक जखमी झाले आहे. घटने दरम्यान राज्य राखीव दलाच्या जवानांचे वाहन जात असताना प्रसंगावधान राखून राखीव जवानांनी बसचालकावर हल्ला करणाऱ्या शस्त्रधारी तरुणास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वणी पोलिसांत सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Assault on bus driver by car driver Driver with carrier injured Nashik Latest Crime News)

कळवण आगाराची बस (एमएच ४० वाय ५९८५) ही बुधवारी (ता.१२) सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान नाशिक येथून कळवणला जात असताना कृष्णगाव येथे प्रवाशांना उतरविण्यासाठी ती थांबली. पाठिमागून आलेल्या पांढऱ्या रंगाची स्विट कारच्या चालकाने बसचालकाला शिविगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. बसमधून प्रवाशी उतरल्यानंतर चालक बस वणी येथे घेऊन येत असताना शंखेश्वर मंदिराजवळ स्विप्ट गाडीच्या (एमएच १५ एचएच ४८७१) चालकाने पाठलाग करीत बसला कार आडवी करुन थांबवली.

बसचालक अनुप कारभारी खैरनार (३८ वर्षे, रा. मानूर) याची गच्ची पकडून बसमधून खाली ओढत मारहाण करण्यास सुरवात केली. याचवेळी चालकाने हातात असलेल्या धारदार शस्त्राने चालत अनुप खैरनार यांच्या शरीरावर वार करीत असताना जीव वाचविण्यासाठी हात पुढे केला असता शस्त्रामुळे खैरनार यांचा हात कापला जावून फॅक्चर झाला. बसचे वाहक दिगंबर भगवान कुवर हेही सहकारी चालकास वाचवत असतांनाही त्यांच्याही हाताच्या बोटावर शस्त्राचा वार पडल्याने त्यांचे बोट कापले गेले.

स्विटचा चालक नशेत असल्याने त्याने शस्त्र हातात घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण करीत असतानाच कळवण येथून नाशिकला जाणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानांच्या पथकाने हा प्रकार पाहिल्याने जवानांनी गाडीतून खाली उतरत प्रसंगावधान राखत दहशत माजविणारा स्वीफ्ट कारचालक महेंद्र प्रभाकर पाटील (उपेंद्रनगर, अंबड, नाशिक) यास झडप घेवून पकडले.

पोलिसही दाखल झाल्याने संशयितास त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान जखमी बसचालक व वाहकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बसचालक अनुप खैरनार यांच्या फिर्यादीवरुन वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT