atkt exam.jpg 
नाशिक

एटीकेटीचा प्रश्‍न "जैसे थे'.. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम...!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेऊन दहा दिवस उलटले असले तरी अद्याप एटीकेटीच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. परिणामी राज्यभरातील दहा लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर या निर्णयाबाबतची टांगती तलवार कायम आहे. 

राज्यात तीन लाख विद्यार्थी संभ्रमात 
राज्यभरातील विविध विद्यापीठांच्या महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बरेचसे नाट्य राज्य सरकार आणि राज्यपालांच्या पवित्र्यामुळे घडले. अखेर सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ज्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला. परंतु अद्यापही अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीबाबत सरकारमार्फत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा नसली तरी या बॅकलॉकच्या विषयांचे काय करायचे? अशा संभ्रामात हे विद्यार्थी आहेत. एटीकेटीची समस्या दूर झाल्याशिवाय या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण तसेच नोकरीसाठी अर्जही करता येणार नसल्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत. 

विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर टांगती तलवार कायम
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे 19 जूनच्या अध्यादेशात राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही सूचना विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. तसेच या दहा दिवसांत याबाबत कोणतीही बैठक घेण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्‍न सुटणार नाही.
केवळ अंतिम वर्षाची परीक्षाच नव्हे, तर एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांची समस्याही सरकारने लक्षात घ्यायला हवी. परीक्षेसोबत याचाही निर्णय सरकारने घेणे आवश्‍यक होते. परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय घेऊन दहा दिवस उलटले तरी एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्‍न सुटणार नाही. आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. - तुषार जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य समाजकार्य समन्वय समिती, नाशिक 

हेही पाहा> ह्रदयद्रावक "...पण पप्पा तर खूप दूर निघून गेले" या वाक्याने सर्वांचेच पाणावले डोळे
राज्यभरात शिक्षण घेणारे विद्यार्थी 
अव्यावसायिक अभ्यासक्रम- सात लाख 30 हजार 
व्यावसायिक अभ्यासक्रम- दोन लाख 80 हजार 
दर वर्षी एटीकेटीसाठी पात्र होणारे विद्यार्थी : 35 टक्के (सुमारे तीन लाख)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

SCROLL FOR NEXT