Police arrest esakal
नाशिक

नाशिक : ATM फोडणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

सातपूर अशोकनगर परिसरात युनियन बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (नाशिक) : सातपूर अशोकनगर परिसरात युनियन बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली.

शनिवारी (ता. २५) पहाटे पाच वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील युनियन बँक व महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही संशयित आले व त्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. फोडण्याचा प्रयत्न करताच सायरन मुंबई ऑफिसमध्ये वाजला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार संजय शिंदे, पोलिस नाईक शरद झोले, अंमलदार अनंता महाले, शिपाई संभाजी जाधव आदींसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले. अजून काही संशयितांचा यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT