Electric Detonator starter esakal
नाशिक

इलेक्ट्रिक स्फोट घडवून शेतजमजूरच्या खुनाचा प्रयत्न

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : शेतातील बोअरवेलवरील वीजमोटारीच्या वायरला जोडून मातीत गाडून ठेवलेल्या डिटेनेटरचा स्टार्टरचे बटण दाबताच स्फोट होऊन शेतजमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १) वावी येथे घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत वावी पोलिसांनी मुख्य संशयितासह डिटोनेटर उपलब्ध करून देणाऱ्या राजस्थानी व्यावसायिकास गजाआड केले आहे. (Attempt to kill an agricultural laborer due to electric explosion at Wavi)

मुख्य संशयित व विक्रेता पोलिसांच्या जाळ्यात

वावी शिवारात सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत हॉटेल पाहुणचारच्या पुढे विवेक लक्ष्मण सांगळे यांची शेतजमीन असून, खंडू रेवजी वाघचौरे (रा. शहा) हे शेतमजूर म्हणून सपत्नीक तेथे काम करतात. सांगळे यांच्या शेतात असलेल्या विहिरीवरील वीजमोटारीचे, तसेच इतर इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी संशयित बाळू कासार (रा. मिठसागरे) याचे नेहमी येणे-जाणे होते. कालांतराने दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे त्याने वाघचौरे यांना ठार करण्याचे ठरविले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातूनच हा स्फोट घडविण्यात आला. जमिनीचे मालक सांगळे यांनी वावी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी वाघचौरे यांना नाशिकला हलविण्यात आले. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाईल स्विचऑफ करुन संशयीत फरार

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी तपास सुरू केला. घटना घडल्यापासून संशयित बाळू कासार याचा मोबाईल स्विचऑफ येत असल्याने तो पोलिसांच्या रडारवर होता. शनिवारी (ता. ३) तो कोऱ्‍हाळे येथे एका लग्नसमारंभास गेल्याचे समजल्यावर पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार नितीन जगताप, प्रकाश उंबरकर, प्रकाश चव्हाण यांच्या पथकाने कोऱ्‍हाळे येथून बाळू कासार याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या सांगण्यावरून तळेगाव (ता. संगमनेर) येथून काळूराम मोहनलाल लोनिया (रा. अजमेर, राजस्थान) यास डिटोनेटर उपलब्ध करून दिल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

(Attempt to kill an agricultural laborer due to electric explosion at Wavi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT