Assistant Inspector Hemant Patil, Sub-Inspector Swapnil Koli and colleagues along with the arrested three suspects who opened fire in Mandul smuggling case esakal
नाशिक

Nashik Crime : मांडुळचा व्यवहार फिसकटल्याने गोळीबार करत खूनाचा प्रयत्न; संशयतींना अटक, मांडूळ जप्त

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : धुळे जिल्ह्यातील मांडूळ तस्करी करणाऱ्या संशयितांचा विश्‍वास संपादन करुन मांडूळ विक्रीसाठी त्यांना मालेगावी बाेलावून सौदा फिसकटल्याने त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत मांडूळ व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारातील शिवलिंग पेट्रोलपंपासमोर हा प्रकार सोमवारी (ता. १३) रात्री घडला. पोलिसांनी मांडुळ खरेदीदार तिघा संशयितांना अटक केल्यानंतर गुन्हा उघडकीस आला.

या प्रकारामुळे धुळे परिसरातील जंगलातून मांडूळ शहरात विक्रीसाठी येत असल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे. ‘सकाळ’ने मांडूळ तस्करीच्या प्रकरणावर वृत्त मालिका प्रसिध्द केली होती. (Attempted murder by shooting after Manduls business deal failed Suspects arrested Mandul seized Nashik Crime news)

या प्रकरणी उमेश मधूकर जाधव (४३, कोरकेनगर, धुळे) याच्या तक्रारीवरुन भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व मांडूळ लुट करणाऱ्या पाच जणांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याउलट पोलिस शिपाई रतिलाल वाघ यांच्या तक्रारीवरुन मांडुळ तस्करी करणाऱ्या उमेश जाधव याच्यासह पाच संशयितांविरुध्द मांडुळ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश जाधव, प्रमोद अहिरे, कैलास मराठे, रामभाऊ व विष्णू (पुर्ण नावे समजू शकली नाहीत) हे संशयित मांडूळ विक्री करण्यासाठी मालेगावी आले हाेते.

संशयितांनी सिराज शेख बशीर (वय २८), मन्सुर मोहम्मद बशीर शेख (१९, दोघे रा. अक्सा कॉलनी), सलमान उर्फ इम्रान खान (२२, रा. बिसमिल्लानगर) यांच्याशी मांडुळ विक्रीचा सौदा ठरविला. मात्र व्यवहार फिसकला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

उमेश त्याच्या सहकाऱ्यांसह मांडुळ घेऊन दुचाकीने धुळेकडे परत जात असताना झोडगे शिवारात त्यांना अडवून संतापलेल्या मन्सुरने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच त्यांच्याजवळील सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे मांडुळ, दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून फरार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहायक अधिक्षक तेगबीरसिंग संधू, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.

यानंतर श्री. कोळी व सहकाऱ्यांनी वेगाने तपास चक्रे फिरवत सिराज शेख, मन्सुर मोहम्मद व सलमान खान या तिघांना अटक केली. उमेश जाधव पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस मांडुळ तस्करी करणाऱ्या प्रमोद अहिरे (रा. हरसुले, ता.जि. धुळे), कैलास मराठे (रा. बाबरे, ता.जि. धुळे), रामभाऊ (रा. पिलखोड), शोएब व विष्णु या संशयितांचा शोध घेत आहेत. तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT