नाशिक : (वावी) येथून जवळच असलेल्या लक्ष्मणपूर येथे रात्रीच्यावेळी शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलास चौघांनी पकडून विषारी औषध पाजत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वावी पोलिसांनी चौघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी आहे घटना
नितीन शरद क्षिरसागर हा रात्रीची वीज असल्याने गट नं. 84 मधील ऊसाच्या व कांद्याच्या पिकास पाणी भरण्यासाठी गेला होता. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास शेजारील उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या माधव बाळासाहेब जोरे (25), वसंत निवृत्ती जोरे 30), नामदेव भगवंत जोरे (32), शिवाजी बाळासाहेब जोरे(38) या चौघांनी नितीन क्षिरसागर याला गाठत त्याचे हातपाय पकडून सोबत आणलेले विषारी औषध बळजबरीने त्याच्या तोंडात ओतण्याचा प्रयत्न केला. चौघांच्या शक्तीपुढे नितीनचे प्रयत्न थिटे पडत होते. नितीनचे हातपाय बांधण्यासाठी त्यातील दोघे दोर आणायला बाजुला जाताच नितीनने दोघांच्या तावडीतून सुटका करुन घेत जिवाच्या आकांताने घराकडे धाव घेतली. घरी पोहचताच नितीनने कुटूंबियांना आपबिती सांगत चौघांनी मला विषारी औषध पाजले, मला दवाखान्यात घेऊन चला असे सांगितले. कुटूंबियांनी नितीनला तात्काळ कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करुन घेतल्यानंतर नितीनने वावी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देत रितसर फिर्याद दिली.
वावी पोलिसांनी चौघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करत वसंत निवृत्ती जोरे व शिवाजी बाळासाहेब जोरे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.