average price of tomatoes in auction is 1 thousand nashik news esakal
नाशिक

Nashik Tomato Rate : आवक वाढल्याने टोमॅटो दरात घसरण; लिलावात सरासरी 1 हजाराचा भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rate : महिनाभरापासून टोमॅटो दर चांगले होते. शेतकऱ्याला बऱ्याच कालावधीनंतर चांगला बाजारभाव मिळत असल्याने आनंदाचे वातावरण होते.

परंतु, पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरात घसरण होताना दिसत आहे. शनिवारी (ता. १२) झालेल्या लिलावात सरासरी एक हजार, सर्वाधिक एक हजार २०० रुपये भाव मिळत आहे. (average price of tomatoes in auction is 1 thousand nashik news)

कधी अवकाळी पाऊस धोका देतो; कधी अस्मानी तर कधी सुलेमानी संकटांनी शेतकरी नेहमीच घेरलेला असतो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते. अक्षरशः बाजारभाव कमी मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आंदोलनही केले होते.

या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती. परिणामी, बाजारभाव चांगला मिळाला होता. सद्यःस्थितीत नाशिक बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव, दोडी- दापूर, मुसळगाव, गुळवंच, दातली, खोपडी, समशेरपूर भागातून टोमॅटो येत आहे. चार-पाच दिवसांपासून आवक वाढली. शनिवारी लिलावात टोमॅटो प्रतिक्रेटला एक हजार ते एक हजार २०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. जवळपास पाच हजार ते सहा हजार कॅरेट्स आवक झाली आहे.

‘पलभर की खुशी’

महिनाभरापूर्वी शेतकरी थोडाफार सुखावला होता, मात्र हा आनंद काही काळापुरताच मर्यादित होता, असे वाटू लागले. दिवसागणिक ज्या प्रमाणात आवक वाढते आहे, त्याच प्रमाणात दरातही घसरण होण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘पलभर की खुशी’ शेतकरी बांधवास मिळते, असे म्हणावे लागेल. तरीही टोमॅटो बाजारभाव दरात फार मोठी घसरण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

सर्वसामान्य ग्राहकांकडून समाधान

महिनाभरापूर्वी दैनंदिन दोन ते तीन हजार कॅरेट्स टोमॅटो विक्रीला येत होते. आवक कमी व मागणी अधिक असल्याने बाजारभाव तेजीत होते. सर्वसामान्य ग्राहकांना पावशेर टोमॅटो खरेदीसाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत होते. मात्र, चार ते पाच दिवसांपासून नवीन टोमॅटो बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने दैनंदिन सात ते आठ हजार क्रेट टोमॅटो दाखल होत आहे.

टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटो बाजारभाव दरात घसरण झाली आहे. ग्राहकांना आठवड्याभरापूर्वी किमान १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागणाऱ्या टोमॅटोला आता किलोला ७० ते ७५ रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT