ganesh visrjan.jpg 
नाशिक

गणेश विसर्जनात गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचे संकेतस्थळ; 'इथं' करा नोंदणी

विक्रांत मते

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी यंदा गणेशोत्सवात गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, त्यासाठी नाशिककरांची साथ मिळावी, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे. त्याच अनुषंगाने मिशन विघ्नहर्ता संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेत नाशिककरांना मूर्ती विसर्जनासाठी टाइम स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मिशन विघ्नहर्ता संकल्पना; नोंदणीचे आवाहन 

गर्दी टाळण्यासाठी स्टॉलवर कधी जायचे? विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव येथे कधी पोचायचे याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी https://www.murtidaan.nmc.gov.in/ या संकेतस्थळाचे लोकार्पण महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २०) झाले. या संकेतस्थळावर शहरातील पहिले पाच मानाचे गणपती तथा आनुषंगिक गणेशोत्सवबाबत बाबीही नमूद केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. या वेळी आयुक्त राधाकृष्ण गमे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शंतनू नाईक, फॉक्सबेरी कंपनीचे प्रतिनिधी संतोष मुंढे, ओम कासार, अभिषेक पाटील, के. के. वाघ महाविद्यालय, संदीप फाउंडेशन, भुजबळ कॉलेज, व्ही.आय.टी. कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. 

वेळेचे नियोजन 

गणेशोत्सव काळात गर्दीमुळे कोरोनाविरोधातील लढाईत बाधा निर्माण होऊ नये, म्हणून स्वच्छतेबरोबरच गर्दी टाळण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेने मिशन विघ्नहर्ता संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने पर्यावरणपूरक उत्सवासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावांवर एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून https://covidnashik.nmc.gov.in:8002/visarjan/ संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. यावर नोंदणी केल्यास नोंदणीधारकाला वेळ कळविली जाणार आहे. मूर्तिदान, मूर्तीचे संकलन, मूर्तीच्या विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वितरण केले जाणार आहे.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT