ZP Nashik esakal
नाशिक

Nashik News : नवीन प्रशासकीय इमारतींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी बांधकाम विभागाने पाठवलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ४६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

ही मंजुरी होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप सुधारित मान्यतेची प्रत जिल्हा परिषदेस प्राप्त झालेली नाही. (Awaiting revised administrative approval for new administrative building Nashik News)

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळील प्रशस्त जागेत नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली. यात २५ टक्के खर्च जिल्हा परिषदेने सेस निधीतून करायचा असून उर्वरित खर्च राज्य सरकार करणार आहे. क्रांती कन्स्ट्रक्शन जानेवारी २०२१ मध्ये इमारतीच्या बांधकामास सुरवात झाली.

दरम्यान महापालिका व नगररचना विभाग यांच्या नियमाप्रमाणे इमारतीच्या आराखड्यात बदल करण्यात आले. त्यात प्रामुख्याने वाहनतळासाठी जमिनीखाली एक मजला वाढवणे, आगप्रतिबंधक उपाययोजना करणे, सुरक्षेच्यादृष्टीने दोन जिने असणे, तसेच बीमची संख्या आदी बदल केले.

यामुळे इमारतीची किंमत २४ कोटींवरून ३८ कोटींपर्यंत गेली. राज्य सरकारने या इमारतीसाठी अधिकाधिक २५ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली होती. त्यापेक्षा अधिक खर्च झाल्यास तो संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेच्या सेसनिधीतून करावा लागेल, असे प्रशासकीय मान्यतेत स्पष्ट केले आहे.

यामुळे या वाढीव खर्चासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. या वाढीव खर्चासाठी सरकारकडून सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यालाही सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

त्यानंतर प्रशासनाने जवळपास तीन महिने याबाबत काहीही हालचाल केली नव्हती. जूनमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यावर सरकारने आधी सुधारित तांत्रिक मान्यता घेण्याचे आदेश दिले.

यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आता सुधारित तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. राज्य शासनाने ४६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिलेली आहे.

मान्यता प्राप्त झालेली असली तरी, प्रत्यक्षात ही सुधारित मान्यतेची प्राप्त झालेली नाही. साधारण मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर महिनाभरात ही सुधारित मान्यतेची प्रत मिळणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटूनही ही प्रत प्राप्त झालेली आहे. मार्च महिन्यात ही मान्यता प्राप्त मिळेल, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT