निफाड : तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील बाळासाहेब सानप यांनी २०१४ मध्ये लागवड केलेली सुधाकर सिडलेस जातीची सहा एकर द्राक्षबाग गारपीटीच्या तडाख्यात सापडल्याने तोडली आहे.
द्राक्षबाग उभारणीसाठी २५ लाखांचे कर्ज काढले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणा अन् बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे द्राक्षबाग तोडण्याचा गंभीर निर्णय घेतला. (ax attack on vineyard worth lakhs in Sonewadi wounds of hailstones on vines and on minds of farmers Nashik)
द्राक्षबाग उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय बँकाकडूनही कर्जाचा बोजा घेऊन चालावे लागते. द्राक्षबाग लागवडीनंतर दोन ते तीन वर्ष प्रत्यक्ष उत्पादन घेण्यासाठी लागतात.
गेल्या १० वर्षांपासून द्राक्ष शेतीवर नैसर्गिक संकटांचा सिलसिला सुरू आहे. कोरोनाचे संकट दोन वर्ष होते. त्यातही नुकसान झाले. या हंगामात सुधाकर सीडलेस व थाॅमसन जातीच्या द्राक्षावर अत्यल्प पाण्यावर नियोजन करत द्राक्षबागेची फळबहार छाटणी घेतली.
द्राक्षमाल तयार होण्यासाठी विविध पोषक अन्नद्रव्य, रोगप्रतिकारक औषधांची फवारणी केली. द्राक्ष तयार होण्याचा काळ निसर्गाच्या संकटात गारपिटीने हिरावल्याने सहा एकर द्राक्षबागेवर गारपीटीमुळे आलेले द्राक्ष व पालवींचा शेतात सडा पडला.
द्राक्षवेलीला गारांमुळे जखमा झाल्या. द्राक्षबाग निष्पर्ण झाली. कर्जाचा बोजा अन् व्याज स्वस्थ बसू देत नाही. त्यापेक्षा द्राक्षबाग तोडण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने बाळासाहेब सानप यांनी सहा एकर द्राक्षबाग तोडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.