crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : बनावट डिमांड ड्राफ्ट बनवून ॲक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा गंडा

बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून ॲक्सिस बँकेच्या येथील शाखेला साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून ॲक्सिस बँकेच्या येथील शाखेला साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

झटपट श्रीमंतच्या होण्याच्या नादात ए. के. ट्रेंडीगचा मालक अनिकेत श्रीनिवास मुंदडा (रा. पिंपळगाव बसवंत) याने साडेतीन कोटीचा बँक घोटाळा केला आहे. (Axis Bank cheated 3 crore by making fake demand draft nashik fraud crime news)

बनावट डिमांड ड्राफ्टच्या आधारावर साडेतीन कोटी रुपये घेऊन मुंदडा फरारी झाला आहे. यामुळे पिंपळगावच्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ए. के. ट्रेडींगच्या माध्यमातून व्यवसाय करणारा अनिकेत मुंदडा व त्याचे साथीदार राजू, मथुराज, विश्‍वास यांनी आठ दिवसांपूर्वी बनावट डिमांड ड्राफ्ट तयार केला.

पिंपळगावच्या महामार्गावरील ॲक्सिस बँकेत डिमांड ड्राॅफ्टच्या सहाय्याने साडेतीन कोटी रुपये काढून पोबारा केला. मुंदडा व त्यांच्या टोळीने दिलेला त्याच क्रमांकाचा डिमांड ड्रॉफ्ट बंगळुरुच्या शाखेत सादर केला. त्यावेळी हा घोटाळा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.मुंदडा याची पाश्‍र्वभूमी ठकबाज अशीच आहे.

झटपट श्रीमंतीच्या नादात त्याने बँकेला गंडा घातला आहे. संशयित फरारी झाले आहेत. ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन राजेंद्रनाथ बाली यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंदडा व त्याच्या तीन साथीदारांविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT