bacchu kadu esakal
नाशिक

'त्या' बहुचर्चित विवाहात बच्चू कडू साधे फिरकलेही नाही!

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : "तुम्ही लग्न लावा, लग्न कोण थांबवतो मी बघतो. मी लग्नाला येईल व नाचेनदेखील," असे वचन देणारे राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) मात्र ऐनवेळी या लग्नात साधे फिरकलेदेखील नाही. त्यामुळे हा विषय नागरिकांसाठी चर्चेचा ठरला. राज्यभरात चर्चेचा ठरलेला व नंतर रद्द झालेला तो आंतरधर्मीय विवाह (hindu-muslim-inter-religious-wedding) सोहळा अखेर नाशिकमध्ये पार पडल्याने वधू-वराच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नाशिक येथे महिन्यापासून आंतरधर्मीय विवाहाची चर्चा सुरू होती. त्यात अनेक वादही झाले. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू (bachhu kadu) यांनी संबंधित कुटुंबांची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही तेच बघतो, एवढेच नव्हे, तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतोदेखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मुलीच्या विवाहास काही जणांकडून विरोधही झाला. पण तरीही हा विवाह गुरुवारी (ता.२२) चांडक सर्कलजवळील आलिशान हॉटेलमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. (bacchu-kadu-absent-in-hindu-muslim-inter-religious-wedding-ceremony-jpd93)

अखेर ‘तो’ बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह झालाच!

हिंदू व मुस्लिम दोन्ही पद्धतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी उपस्थित होते. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या लग्नास मुलीच्या जात पंचायतीने प्रखर विरोध दर्शविला होता. विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. असे करणे म्हणजे जात पंचायतच्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा भंग आहे, हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळला व विवाह सोहळा शांतपणे पार पडला. -कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, अंनिसचे जात पंचायत मूठमाती अभियान

भविष्यात मुलीचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही वडील व त्यांच्या कुटुंबीयांची समजूत घातली. सुरवातीला त्यांनी समर्थन दर्शवून हा विवाह सोहळा रद्द झाल्याचे लेखी पत्रदेखील दिले. मुलगा शोधून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली. नंतर मात्र आमच्याशी दगाबाजी करून कुटुंबीयांनी गुपचूप विवाह लावला. समाज त्यांना कधीच माफ करणार नाही. आजपासून आमचा व त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहाणार नाही. - गजू घोडके, जिल्हाप्रमुख, ओबीसी सुवर्णकार समाज, नाशिक

विवाह सोहळा अगदी आनंदात पार पडला. कुठल्याही प्रकारचे विघ्न आले नाही. जवळचे सर्व थोडेच शुभचिंतक उपस्थित होते. सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद! - प्रसाद आडगावकर, मुलीचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे - जय पवार

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT