bank fraud.jpg 
नाशिक

धक्कादायक! बॅंक खाते एकाचे अन् खात्याचा पासवर्ड बदलतंय दुसरंच?...संशय आल्याने फुटले बिंग

सकाळवृत्तसेवा

नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनिवासी भारतीयांच्या बॅंक खात्यात बेनिफिशरी म्हणून स्वतःचे नाव लावून बॅंक खात्यात घुसखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर झाले असे की... 

असा आहे प्रकार

नाशिक रोडला आयसीआयसीआय बॅंकेतील अनिवासी खातेदाराच्या खात्यात घुसखोरीच्या आरोपावरून नाशिकच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जिमीनी व माधवी दवे यांचे आयसीआयसीआय बॅकेत एनआयआर सेव्हींग खाते आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या खात्यात बेनिफिशरी म्हणून नाव लावून त्या खात्याचा इंटरनेट बॅकींगचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न झाला. संतोष लक्ष्मण सांगळे (वय ३७, वरद विनायक अर्पाटमेंट जायभावे नगर पाथर्डी फाटा) किशोर गुलाबराव देसले (वय ४१, शिया रो हाउस वृंदावन नगर कामटवाडा) ललित निकम अशा तिघा संशयितांनी बॅंकेत संपर्क साधून बनावट कागदपत्र सादर करून दवे यांच्या बॅक खात्याचा पासवर्ड बदलण्यासाठी बॅकेत बनावट कागदपत्र सादर करून खात्यात ललित निकम यांचे नाव घुसविण्याचा प्रयत्न केला. 

फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॅकेच्या आपल्या खात्यात पैसे काढण्यासाठी कुणीतरी ललित निकम हा बोगस बेनिफिशरी म्हणून नाव लावण्याची घुसखोरीचा हा प्रयत्न करीत असल्याचे खातेदार डॉ. दवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने बॅंकेशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर आयसीआयसीआय बॅंकेतर्फे विजय विठ्ठल पवार (वय ३६) ब्रीजनगर जुना सायखेडा रोड यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT