Keshav Elmame, Dattu Sadgir, Sahebrao Gangurde and former officials of Gram Panchayat surrounded the group development officers and informed them about the problems in the village.
Keshav Elmame, Dattu Sadgir, Sahebrao Gangurde and former officials of Gram Panchayat surrounded the group development officers and informed them about the problems in the village. esakal
नाशिक

Nashik News : नागरी सुविधांची वानवा अन् पुरस्कारांचा गोडवा! पुरस्कारप्राप्त शिरसाठे गावाची दैना

सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : राजकीयदृष्ट्या अग्रेसर शिरसाठे गावाच्या नावावर कागदोपत्री शासनाच्या पुरस्कारांची शृंखला मोठी आहे. शिरसाठे गावाने स्वच्छ सुंदर गाव तसेच माझी वसुंधरांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.

आणखी एका अशाच पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीजवळ चित्रीकरण सुरू असताना गटविकास अधिकारी लता गायकवाड आलेल्या असताना ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत गावाच्या अडचणी समस्यांचा जणू पाढाच वाचला. (bad civic facilities at award winning Shirasathe village Nashik News)

कागदोपत्री लाखो रुपयांची बक्षिसे घेणाऱ्या गावात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना फेरफटका मारण्याचा आग्रह ग्रामस्थांनी केला. सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने गावाच्या मुख्य रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य तसेच दोन वर्षांपासून बसविलेल्या फिल्टरला पिण्याचे पाणी नाही, हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना केवळ कागदावरच असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

विशेष म्हणजे गावात कुठल्याच सुविधा नसताना मग गावाला पुरस्कार मिळाले तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव, तसेच ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजना अशाप्रकारे अनेक योजना फक्त कागदावरच असल्याचे ग्रामस्थ केशव एलमामे व माजी सरपंच बाळासाहेब सदगीर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले.

ग्रामसेवकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शासनाचा निधीच नाही, तर कामे कशी होणार, असे सांगितले. यामध्ये गावात ग्रामपंचायत व शेजारील परिसर रंगरंगोटी करून ग्रामपंचायतीने पुरस्कार स्वीकारल्याचे दिसत आहे. ग्रामस्थ बाळासाहेब सदगीर, केशव एलमामे, दतू सदगीर, राजाराम एलमामे, साहेबराव गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

"गावात चार वर्षांत फक्त झाडांची व ग्रामपंचायतीची रंगरंगोटी झाल्याचे दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी शुद्ध पाण्याचे फिल्टर बसविले आहे. मात्र आजपर्यंत एक ग्लासही पाणी प्यायला मिळालेले नाही. गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. त्यामुळे आमच्या गावाचे पुरस्कार हे फक्त कागदोपत्रीच आहेत." - केशव एलमामे, ग्रामस्थ, शिरसाठे

"गावातील प्रत्येक नळाला पाणी आहे. टाकीत पाणी आहे. गावात भूमिगत गटार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अंतर्गत गटारीचा वापर केला पाहिजे तसेच उघड्यावरील पाणी गटारीत टाकले आहे. शंभर टक्के नळांना पाणी येत आहे. फिल्टरचा डिस्प्ले फुटला आहे. गावात आठ हजार झाडेदेखील लावली आहेत." -हनुमान दराडे, ग्रामसेवक, शिरसाठे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT