Inward sloping roof in Panchayat Samiti. In the second photo, the litter in the light board esakal
नाशिक

Nashik News: इगतपुरी पंचायत समितीतील सुशोभीकरण कामाची दुरवस्था; स्वच्छतेकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्याचा प्रशासकीय मुख्य कारभार जिथून चालतो त्या पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असलेल्या छताचे आणि भिंतीचे सुशोभीकरण दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते.

येथे विविध क्रांतिकारक व महापुरुषांच्या मूर्ती रूपातील प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. मात्र आता या सुशोभीकरणाच्या कामाची दुरवस्था झाली असून छत कोसळले आहे. (Bad condition of beautification work in Igatpuri Panchayat Samiti Neglect of cleanliness Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छताखालून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. तसेच, स्मारकाच्या आजूबाजूचा भाग निखळून पडला असून येथील स्वच्छतागृहातही स्वच्छ भारत अभियानाचे धिंडवडे निघाल्याचे पहावयास मिळत आहे.

स्वच्छतागृहातील बेसिन तुंबले असून येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत बोर्डात कचरा कोंबण्यात आला आहे. पंचायत समितीच्या अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.

तसेच, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची अनेक कामे रेंगाळली आहे. पंचायत समिती कार्यालय केवळ शोभेची वास्तू असल्याची चर्चा सुरू आहे. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT