An overturned sugarcane truck
An overturned sugarcane truck esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाली असून दर्जेदार रस्ते होण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

यात तालुक्यात विविध ठिकाणी अतिशय संथ गतीने व निष्कृष्ट दर्जाचे कामे होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याची प्रचिती पाडे - निगडोळ - पिंपळगाव धुम फाटा सुरु असलेला रस्त्याकडे बघितल्यावर दिसून येते. (Bad condition of roads in Dindori taluka Citizens suffer due to bad roads Nashik News)

पाडे निगडोळ -नळवाडपाडा- पिंपळगाव धुम फाटा या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असून अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे. असे असताना देखील संबंधित अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेतात हे विशेष. पाडे - निगडोळ सात किमी तर निगडोळ - पिंपळगाव धुम फाटा सात किमी असे १४ किमी रस्त्याचे काम आहे.

झालेल्या रस्त्याचे काम दोन दिवसातच खडी उखडून गेली आहे. खडी टाकताना डांबरचा वापर न केल्याने खडी उखडून चालली आहे. या खडीमुळे वाहने पलटी होत आहे. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमाल या रस्त्यावरून नाशिक, पेठ, पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये घेऊन जावा लागतो.


हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

त्यामुळे चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस भरलेला ट्रक या रस्त्यावर पलटी झाल्याने शेतकऱ्यां‍चे व वाहनाचे नुकसान झाले आहे. असे प्रकार नित्याचेच झाले आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल रस्त्यावर टाकण्याची वेळ येत असल्याने शेतकऱ्यांसह वाहनधारक संतप्त झाले आहे.

संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर या कामाला गती मिळवून दर्जात्मक काम करावे अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT