Bad Road Condition
Bad Road Condition esakal
नाशिक

Nashik : पावसामुळे साक्री रस्त्याची वाट

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : शहर व परिसरात झालेल्या पावसाने (Monsoon Rain) जवळपास सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यमार्ग असलेला नामपूर- साक्री रस्ता येथील शिवछत्रपती मंगल कार्यालयाजवळ खराब झाल्याने अक्षरश: गटारीसारखी अवस्था झाली आहे. परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्याचे (Potholes) साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे पडले असून, त्यात पाण्याचे डबके साचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्विकारण्याचा इशारा दिला आहे. (bad condition of sakri roads due to rain Nashik News)

शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून साक्री रस्ता ओळखला जातो. धुळे जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने अनेक वाहनचालक साक्री रस्त्याला प्राधान्य देतात. तसेच, शहरातील अनेक शेतकऱ्यांची शेती साक्री रस्त्यालगत असल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. परंतु, खड्डयांमुळे अपघाताची दाट शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा लहान- मोठ्या अपघातात निष्पाप दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अर्धवट गटारीमध्ये अनेक वर्षांचा मलबा साचल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर आरसीसी गटारी बुजविण्यात आल्याने ‘पैसा गेला पाण्यात’ अशी अवस्था आहे. मोसम खोऱ्यात झालेल्या पावसाने रस्त्यांच्या साईडपट्टया, खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली माती आणि रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे.

सार्वजानिक बांधकाम विभागाने मोसम खोऱ्यातील रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, प्रा. गुलाबराव कापडणीस, जेसी गटाचे नेते विलास सावंत, अरुण खुटाडे, नामपूर बाजार समिती सभापती कृष्णा भामरे, शिवछत्रपती मंगल कार्यालयाचे अध्यक्ष अविनाश सावंत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ॲड. रेखा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव, माजी सरपंच प्रमोद सावंत, अशोक पवार, माधवराव सावंत, नारायण सावंत, मुन्ना गायकवाड, मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष रवी देसले, तालुका उपाध्यक्ष कुणाल पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख समीर सावंत, शहराध्यक्ष मनोहर पाटील, मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, जितेंद्र सूर्यवंशी, कमलाकर सोनवणे, सुनील निकुंभ, तारिक शेख, राजू पंचाळ, सुरेश कंकरेज, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष किशोर मोरे आदींनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT