Smart road nashik
Smart road nashik esakal
नाशिक

स्मार्ट रोडची झाली वाट बिकट; नाशिककरांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ रस्ता कोट्यवधींचा निधी खर्च करून ‘स्मार्ट रोड’ करण्यात आला खरा. मात्र, स्मार्ट रोडने प्रवास करायचा म्हटला, तर नाशिककरांना मनस्तापालाचा सामोरे जावे लागते. या स्मार्ट रोडवरील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगकडे स्मार्ट सिटी कंपनी व वाहतूक पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ‘बिकटवाट’ तर झालीच आहे, शिवाय स्मार्ट रोड म्हणून जे काही सौंदर्य आहे, त्यालाही बाधा पोहोचली आहे.

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिकचा समावेश झाला आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. याच प्रकल्पांतर्गत नाशिकमधील पहिला प्रयत्न त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा रस्ता स्मार्ट करण्यात आला. त्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिकचा कालावधी खर्ची पडला. त्यानंतर फूटपाथ, बसथांबा, सायकल ट्रॅक, पथदीप, अशा संकल्पनांतून स्मार्ट रोड साकारला खरा. मात्र, आज या स्मार्ट रोडवरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांना जिकीरचे होऊन बसले आहे. नित्याची वाहतूक कोंडी, सीबीएसपासून ते अशोक स्तंभापर्यंत सायकल ट्रॅकवरच चारचाकी वाहनांची पार्किंग, फुटपाथवर दुचाकींची पार्किंग केल्याने रस्ता वाहतुकीला अरुंद होऊन कोंडीची समस्या निर्माण होऊन अवघ्या दीड-दोन किलोमीटर अंतरासाठी बराच वेळ खर्ची जातो. अशा रस्त्याला ‘स्मार्ट रोड’ म्हणावा का, असा संतप्त सवालच नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

सायकल ट्रॅक-फुटपाथची दुरवस्था

स्मार्ट रोडच्या दुतर्फा दर्जेदार असा फुटपाथ व सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अशोक स्तंभापर्यंत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सायकल ट्रॅकचा वापर चारचाकी वाहनचालक वाहन पार्किंगसाठी करतात. या चारचाकी वाहनांमुळे सायकल ट्रॅकसाठी असलेले लहान कठडे व त्यावरील पिवळ्या रंगाच्या आवरणे फुटली आहेत. तसेच फुटपाथचाही वापर दुचाकी पार्किंगसाठी वापर केला जातो. तसेच शहर बस थांब्यांवरही बससला थांबायला कधी-कधी जागा नसते. त्यामुळे यापूर्वी या रस्त्याची जी स्थिती होती, आता त्याहीपेक्षा बिकट झाली आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन सकाळ-सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते.

कारवाईबाबत उदासीनता

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत या रोडची उभारणी करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. तरीही बेशिस्त वाहनचालकांकडून या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, तर वाहतूक पोलिस या रोडवरील अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल आणि सीबीएस सिग्नल याठिकाणी कारवाईसाठी ठाण मांडून असतात. अशोक स्तंभाकडून त्र्यंबक रोडकडे येणाऱ्या रोडवर नो-पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी वाहनांची टोईंग केली जाते, तशी चारचाकी वाहनांची केली जात नाही. सीबीएसपासून अशोक स्तंभापर्यंतच्या सायकल ट्रॅकवर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई वाहतूक पोलिसांकडून होत नाही. याच वाहनांमुळे स्मार्ट रोडची वाट बिकट झाली आहे. या उदासीनतेमुळे मनस्ताप होणारे नागरिक वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त करतात.

''स्मार्ट रोड शहराचे सौंदर्य आहे. चारचाकी वाहने वापरणारे सजग नागरिक आहेत. त्यांनीच हे सौंदर्य टिकविले पाहिजे. सायकल ट्रॅकवर वाहने पार्क करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक शाखेकडून नियमित टोईंगची कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईला मर्यादा पडते. महत्त्वाची शासकीय कार्यालये याठिकाणी असल्याने गर्दी होते. आणखी जनजागृती करणे व कारवाई करणे एवढेच वाहतूक शाखा करू शकते. ते अधिक प्रमाणात केले जाईल.'' - पौर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT