water scarcity esakal
नाशिक

Nashik Water Crisis: इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामाला बुरे दिन! शेतकऱ्यांसमोर मशागतीसह पाण्याचे संकट कायम

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : ऑक्टोबरमध्ये पाऊस न झाल्याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत खरीप हंगामातील भात शेतीला मोठा फटका बसला आहे. शेतांमध्ये ओलावा नसल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर होणार आहे.

ओलावा व दलदल यांची विसंगती झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र आहे. तालुक्यात रब्बी हंगामाला बुरे दिन येण्याची दाट शक्यता आहे. (Bad day for Rabi season in Igatpuri taluka Water crisis continues with cultivation in front of farmers nashik)

यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरण्या जुलैनंतर झाल्या. भात, वरई, उडीद, सोयाबीन व नागली यासारखी पिके आता काढण्यात येत आहेत. यातील काही पिकांची सोंगणी झाली असून, काही पिके अजूनही शेतात उभी आहेत.

त्यामुळे तालुक्यात रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता आहे. त्यात परतीच्या पावसाची वाट बघता बघता रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. या वर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी जास्त असल्याने रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वातावरणातील बदलानुसार तालुक्यात गहू, हरभऱ्यासह इतर पिकांच्या पेरणीला सुरवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली, तरी चालणार आहे. या साऱ्या पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे.

प्रत्यक्षात हीच पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकऱ्यांना तूर्ततरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

"तालुक्यात परतीचा पाऊस न झाल्याने भात शेतीला चांगल्याच फटका बसला आहे. खरीप हंगामात खते, बी-बियाणे, मजुरी, औषध, वीजबिल, फवारणीवर भरपूर खर्च झाला आहे. शेतात अपेक्षित ओलावा नसल्यामुळे शेतात कोणतेही पीक घेता येणार नाही. पुढे दोन महिने शेत अंगावर पडणार आहे."-उमाजी रोंगटे, शेतकरी, कवडदरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT