Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Sudhakar Badgujar: बडगुजर यांच्या कंपनीने केलेल्या कामांची यादी मागविली

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सलीम कुत्ता सोबतचे व्हिडिओ सभागृहात दाखवत आमदार नीतेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Sudhakar Badgujar : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम शेख ऊर्फ सलीम कुत्ता यांच्यासमवेतचे नृत्य व लाचलुचपत विभागाने शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पोलिस व शासनाने बडगुजर ॲन्ड कंपनीची माहिती मागवली आहे.

त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागांसह बांधकाम विभागाने माहितीची जुळवाजुळव सुरू केली आहे. बडगुजर ॲन्ड कंपनीला आतापर्यंत दिलेले काम व झालेली आर्थिक उलाढाल याची माहिती पोलिसांना सादर केली जाणार आहे. (Badgujar company asked for a list of works done nashik news)

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सलीम कुत्ता सोबतचे व्हिडिओ सभागृहात दाखवत आमदार नीतेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी प्रस्तावित केली. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बडगुजर ॲन्ड कंपनीने महापालिकेच्या एका टेंडर संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. बडगुजर यांचा कंपनीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सलीम कुत्ता संदर्भातील व्हिडिओ तसेच लाचलुचपत विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने महापालिकेला प्राप्त झालेल्या सूचनेनुसार बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाकडून बडगुजर ॲन्ड कंपनीने केलेल्या कामांची यादी मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महायुतीच्या नेत्यांकडूनही पत्र

महायुतीच्या नेत्यांनीही बडगुजर यांच्याशी संबंधित असलेल्या कामांकडे अंगुलिनिर्देश करत आयुक्तांना पत्र सादर केले आहे. त्या पत्रात बडगुजर यांनी केलेल्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली असून, बडगुजर ॲन्ड कंपनीशी संबंधित असलेले कागदपत्रे तसेच बांधकाम विभागाकडे रजिस्टर झालेल्या कंपन्यांची माहिती मागविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT