Sudhakar Badgujar Fraud Case esakal
नाशिक

Sudhakar Badgujar Fraud Case : बडगुजरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अपहारप्रकरण

'लाचलुचपत’ प्रतिबंधक विभागाकडून आक्षेप घेण्यात आल्याने बडगुजर यांच्यासह दोघांना १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Sudhakar Badgujar Fraud Case : महापालिकेच्या विविध कामांचा ठेका घेत नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे अंतरिम जामीन सुनावणीवेळी मंगळवारी (ता.९) न्यायालयात गैरहजर राहिले.

त्यावर ‘लाचलुचपत’ प्रतिबंधक विभागाकडून आक्षेप घेण्यात आल्याने बडगुजर यांच्यासह दोघांना १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Badgujar ordered to appear in court nashik news)

सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण या तिघांविरोधात सरकारवाडा पोलिसात अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना चौकशीसाठी बोलाविले असता, बडगुजर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीन मिळविला होता.

या अंतरिम जामिनाची मुदत मंगळवारी (ता.९) संपल्याने सदरचा अंतरिम जामीन नियमित करण्यासाठी न्यायालयात सुनावणी होती. परंतु यावेळी सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघेही न्यायालयात गैरहजर होते. त्यावर सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी आक्षेप नोंदविला.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी विश्वजित जाधव यांनीही युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने अंतरिम जामीन नियमित न करता तिघा संशयितांना येत्या १७ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जांची ‘लाचलुचपत’च्या पथकाने खुली चौकशी करून तपासाअंती १७ तारखेला गुन्हा दाखल केला आहे. यात बडगुजर यांच्यासह तिघांना अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT