Tourist Place
Tourist Place esakal
नाशिक

Nashik : पक्ष्यांच्या किलबिलाटाने बागलाणचा परिसर बहरला; पर्यटकांना पडतेय भुरळ

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : कुठे तळ्यात... तर कुठे रानावनात... जंगलही हिरवीगार झाली... पक्ष्यांना पाहणे अन् कॅमेऱ्यात कैद करून एक सुखद अनुभव पर्यटक घेत आहेत. सध्या मालेगाव, बागलाणच्या पश्चिम भागातील गडकिल्ले, वनपरिक्षेत्रातील बहरलेल्या हिरव्यागार जंगलातील निसर्गाविष्कार पशूपक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना भुरळ घालत आहे. रोज शेकडो पर्यावरणप्रेमी या परिसरात दाखल होत आहेत. (baglan area blossomed with chirping of birds Tourists are attracted Nashik Latest Marathi News)

मालेगाव उपविभागीय वन विभागाकडून ठिकठिकाणाच्या जंगलहद्दीत लागवड केलेले वृक्षारोपण यशस्वी झाल्यामुळे बोडके झालेले जंगल आता हिरवीगार दिसून येत आहेत. बोचऱ्या थंडीची चाहूल लागताच पहाटेचा गारवा आणि घनदाट जंगलात व डोंगर परिसरातील पहाटे धुक्याची पसरलेली चादर, त्यातच विविध पक्ष्यांचा किलबिलाट जणू परिसर पक्ष्यांचे नंदनवन झाल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत.

बागलाण तालुक्यातील मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान, साल्हेर, मुल्हेर, बिस्टा, क-हा, डेरमाळ, मांगीतुंगी, पिसोळ किल्ला, कुलस्वामिनी चिराई देवी मंदिर, कमळाचे फुलपगार, हिंदळबारी, हरणबारी धरण, देवळाणेतील प्राचीन कालीन हेमाडपंती जोगेश्वर महादेव मंदीर, अंतापूर दावल मलिक, मुल्हेर उद्धव महाराज, अलियाबादचे प्राचीन शिवमंदिर, प्राचीन तीर्थक्षेत्र दोधेश्वर व कपालेश्वर येथील महादेव मंदीर, प्राचीन कालीन पिंपळेश्वर, जायखेड्यातील वारकरी संप्रदायातील (कै.) कृष्णा माउली, श्रीपुरवडे येथील दुमजली भीमाशंकर मंदिर आदी तसेच मालेगाव तालुक्यातील गाळणा, दुंधा, भुईकोट किल्ला, चंदनपुरीतील खंडोबा महाराज मंदिर, डोंगराळेतील जैतोबा, देवदरा देवस्थान, वडनेर खाकुर्डी येथील वर्जेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदीर अजून बरेच प्राचीनकालीन असलेला ठेवा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.

पुरातत्त्व विभागाकडून यांकडे लक्ष घालत प्राचीन कालीन ठेवा जतन करण्याची गरज असल्याची भावना पर्यटनप्रेमींनी केली आहे. चौकट अवैध वृक्षतोडीला बसला चाप ताहाराबाद, सटाणा व मालेगाव येथून मागील काळात सर्रासपणे अनधिकृत वृक्ष तोडून वाहतूक होत होती. ताहाराबाद वनपरिक्षेत्रात शिवाजी सहाणे, सटाण्यातील वनपरिक्षेत्रातील प्रशांत खैरनार व मालेगाव उपविभागीय कार्यालयातील वैभव हिरे यांनी अनेक अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही केली.

यामुळे संबंधित लाकूड माफियांचे धाबे दणाणले आहेत. वृक्षतोडीला काही प्रमाणात चाप लागल्यामुळे जंगलात सर्वत्र हिरवीगार बहरलेले दिसून येत आहे. नव्यानेच आलेल्या अधिकाऱ्यांनी एका वर्षात जंगलांचा होणारी ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्न केल्याने जंगलात मोर, ससे, काळवीट, बिबट, तरस, लांडगे, कोल्हे, विविध पक्ष्यांचा वावर वाढला आहे.

"जंगल परिसरात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवीगार झाडे दिसून येत आहेत. यामुळे पक्ष्यांचे आगमन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पर्यटक हिरवीगार दृश्य पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात." - वैभव हिरे, वनपरिक्षेत्र आधिकारी, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT