sanjay Raut 
नाशिक

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना जामीनपात्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा

Sanjay Raut : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची गिरणा मोसम शुगर्स ॲग्रो अलाईड शेअर प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यात खासदार राऊत यांना न्यायालयात हजर न झाल्याने जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. (Bailable warrant for MP Sanjay Raut nashik news)

बदनामी खटल्यात शनिवारी (ता. ४) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश राऊत यांना मागील तारखेस देण्यात आले होते. शनिवारी न्यायालयात खासदार राऊत गैरहजर राहिले. त्यांच्यातर्फे त्यांचे वकील काळे यांनी अर्ज दिला. या अर्जात मराठा आरक्षण आंदोलनामुळे पुढाऱ्यांना गावबंदी आहे.

आंदोलनामुळे कार्यकर्त्यांच्या असंतोषाला राजकीय पक्षाच्या नेत्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी या वादांना हिंसक स्वरूप प्राप्त झाले. न्यायालयात हजर राहण्यासाठी आल्यास आंदोलक कार्यकर्त्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे नमूद करण्यात आले.

खासदार राऊत यांच्या वकिलांच्या या अर्जाला भुसे यांचे वकील सुधीर अवकर यांनी सक्त लेखी हरकत घेतली. तूर्तास मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले असून, सध्या कोणत्याही प्रकारे मालेगाव येथे कोणतेही आंदोलन नाही. खासदार राऊत यांच्यातर्फे दिलेल्या अर्जातील म्हणणे कायदेशीर व प्रामाणिक नाही.

त्यामुळे त्यांचा गैरहजेरीचा अर्ज नामंजूर करावा, असे लेखी म्हणणे मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खासदार राऊत यांना ५० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट काढले असून, गैरहजेरीचा अर्ज नामंजूर केला आहे. या खटल्यासाठी २ डिसेंबर ही आगामी तारीख देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT