Bala Pathak giving food to pigeons
Bala Pathak giving food to pigeons  esakal
नाशिक

Nashik News : पक्ष्यांची भूक भागविण्यासाठी ‘त्यांचा’ 4 वर्षापासून नित्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तीनशे पेक्षाही अधिक पारवांना दाणे टाकून आत्मिक समाधान प्राप्त करणारे बाळा पाठक यांचे त्या पारवांशी अनोखे नाते निर्माण झाले आहे. कितीही महत्त्वाचे काम असले तरीदेखील वेळेत ते त्या ठिकाणी हजर होऊन पारवांच्या पोटाची भूक भागवत असतात. (Bala Pathak giving food to pigeons from last 4 years nashik news)

गेल्या चार वर्षापासून त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. दैनंदिन दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कार्यालय आवारात येणाऱ्या पारवांना धान्याचे दाणे टाकणे, त्यांची पाण्याची तृष्णा भागविण्याचा उपक्रम सुरू केला. दोन ते चार, चार चे आठ अशी पाखरांची दैनंदिन संख्या वाढत गेली.

सध्या तीनशे पेक्षाही अधिक पाखरे त्या ठिकाणी येऊन पोटाची भूक आणि पाण्याची तहान भागवत आहे. आवारातील इमारतीच्या छत, केबल वायर, तार अशा विविध ठिकाणी पारवा येऊन बाळा पाठक यांची येण्याची वाट पाहत असतात.

त्यांचे वाहन दिसताच सर्व पाखरे खाली जमिनीवर येऊन थांबतात. जणू त्याठिकाणी त्यांची शाळा भरली की काय असे वाटत असते. श्री.पाठकही कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता वाहनातून उतरून दाणे टाकत त्यांची भूक भागवत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या चार वर्षापासून त्यांचा तो नित्यक्रम झाल्याने त्यांनाही दैनंदिन दुपारी चार वाजले की त्या पारवांना भेटण्याची ओढ लागत असते. कितीही महत्त्वाचे काम राहिले, तरी ते वेळेत वेळ काढून पंधरा मिनिटे तरी ते येऊन दाने टाकत असतात.

परिसरातील नागरिक त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असतात. पारवेदेखील त्यांच्या पोटाची भूक आणि पाण्याची तहान भागली की पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परततात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT