hospital esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरीत गरिबांसाठी ‘आपला दवाखाना’! महाराष्ट्र दिनापासून जनतेसाठी खुला होणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी शहरात गांधीनगर- सिद्धार्थनगर उपकेंद्रात गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहे.

राज्य शासनाने त्याला नुकतीच मंजुरी दिली असून या दवाखान्यामुळे गरीब जनतेची मोठी सोय होणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून हा दवाखाना जनतेसाठी खुला होईल अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांनी दिली. (balasaheb thackeray Aapla Dawakhana for poor in Dindori will open to public from Maharashtra Day Nashik News)

देशातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असून त्यात आरोग्याला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्यामुळे दिंडोरी शहरातील प्रत्येक प्रभागात यापूर्वी लसीकरण मोहीम करण्यात आली होती.

त्याचा लाभ जनतेला झाला होता. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयुष्यमान भारत योजना दिंडोरी शहरात राबवण्यात आली असून त्यासाठीही कॅम्प घेण्यात आले. या योजनेचा गरीब बांधवांना लाभ होत असून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेसाठी ‘आपला दवाखाना’ हा दिंडोरी शहरातील सिद्धार्थनगर आरोग्य उपकेंद्रात सुरू होणार आहे.

याबाबत मंत्री डॉ. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सध्या सिद्धार्थनगर उपकेंद्र तळेगाव आरोग्य केंद्रांतर्गत येते.

आत याचा उपकेंद्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाने त्यास मंजुरी दिली आहे. या दवाखान्यात एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक राहतील. एक फार्मासिस्ट, एक परिचारिका, एक मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळेल. उपलब्ध जागेनुसार व सुविधा उपलब्ध होतील. त्याप्रमाणे १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील.

कान- नाक- घसा तज्ज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तपासणीतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ, दंतशल्यचिकित्सा, बालरोगतज्ज्ञ आदी सुविधा देण्याचा प्रयत्न पुढील काळात राहणार आहे. आपल्या दवाखान्यात टॅबच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण, निदान केलेली पद्धती याचा तपशील नोंदवण्यात येणार आहे.

१५ व्या वित्त आयोगातून ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याबाबत ५ व १० मे २०२२ ला मंत्री डॉ. भारती पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्याकडे अंकुश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अर्ज केला होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सिद्धार्थनगर येथील दवाखान्यास मंजुरी दिली आहे.

या भागातील जनतेला लाभ

महाराष्ट्र दिनापासून सुरू होणाऱ्या या दवाखान्यामुळे दिंडोरी शहरातील गांधीनगर, इंदिरानगर, सिद्धार्थनगर, जाधव वस्ती, निळवंडी, पिंगळ वस्ती, शिवाजीनगर, लुंबिनीनगर, वक्रतुंडनगर, कादवानगर, कराटे वस्ती, विठ्ठलनगर या परिसरातील गोरगरीब जनतेला लाभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT