Ban on education in Pakistan Instructions for students by AICTE, UGC Nashik News esakal
नाशिक

पाकिस्‍तानातील शिक्षणास मनाई; AICTE, UGC ची विद्यार्थ्यांसाठी सूचना

अरूण मलाणी

नाशिक : दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात असतात. मात्र पाकिस्‍तान (Pakistan) येथून शिक्षण घेऊन परतलेल्‍या विद्यार्थ्यांना यापुढील काळात भारतात उच्च शिक्षण किंवा रोजगार मिळविण्यासाठीचे दार बंद होणार आहेत. यासंदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी संयुक्‍तरित्‍या परीपत्रक जारी केले आहे.

एआयसीटीई आणि युजीसी यांनी जारी केलेल्‍या परिपत्रकात स्‍पष्ट सूचना करण्यात आल्‍या आहेत. परीपत्रकात म्‍हटले आहे, की विद्यार्थ्यांनी पाकिस्‍तान येथे उच्च शिक्षणासाठी जाऊ नये, असा सल्‍ला दिला जातो आहे. भारतातील नागरीक किंवा अनिवासी भारतीय यांनी ज्‍यांना पाकिस्‍तानमध्ये पदवी महाविद्यालय किंवा अन्‍य शैक्षणिक संस्‍थेत प्रवेश घ्यायचा आहे, अशांना या शिक्षणाच्‍या आधारावर भारतात उच्च शिक्षणाची संधी मिळणार नाही. तसेच रोजगारदेखील उपलब्‍ध होण्यासाठी हे शिक्षण ग्राह्य धरले जाणार नाही. त्‍यामूळे पाकिस्‍तान येथे जाऊन कुठल्‍याही शाखेतील शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या शिक्षणाचा भारतात उपयोग होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु होत असतांना एआयसीईटी आणि युजीसी यांच्‍यातर्फे ही सूचना जारी केलेली आहे.

त्‍यांना मिळणार सवलत

दरम्‍यान स्‍थलांतरीत किंवा त्‍यांच्‍या पाल्‍यांनी पाकिस्‍तान येथे शिक्षण घेतले असेल, व त्‍यांना जर भारताचे नागरीकत्‍व प्रदान केले असेल, अशांना सवलत दिली जाणार आहे. आवश्‍यक त्‍या सुरक्षिततेच्‍या परवानग्‍यांची पूर्तता केल्‍यानंतर अशा व्‍यक्‍तींना रोजगार मिळविण्यासाठी त्‍यांची पाकिस्‍तानमधील शिक्षण घेतलेली आर्हता ग्राह्य धरली जाईल, असे परीपत्रकात स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

SCROLL FOR NEXT