ban on PoP Ganesh idol by municipal commissioner nashik news esakal
नाशिक

Nashik News : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर; पीओपी गणेशमूर्तीवर यंदा बंदी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, त्यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तीचा साठा करणारे व विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले. (ban on PoP Ganesh idol by municipal commissioner nashik news)

नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींची विक्री व साठा करण्यास बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी आयुक्त करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

१९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. त्यापूर्वी पीओपी मूर्ती व विक्रीला शहरात प्रतिबंध घालण्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. गोदावरी नदी व इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या दृष्टीने शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मागील वर्षी २००९ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. विक्रेत्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्टॉल धारकांकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती विक्री न करण्यासंदर्भात हमीपत्र घेतले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT