band pathak.jpg
band pathak.jpg 
नाशिक

अनलॉकमध्ये बँडपथक लॉकडाउनच! लग्नसराईचा दुसरा हंगामही चालला वाया 

विनोद बेदरकर

नाशिक : काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रकिया सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही मंदिरांसह अनेक व्यवसाय लॉकडाउन आहेत. यंदाच्या वर्षातील दुसरा लग्नसराईचा हंगामही वाया चालल्याने बँड व्यावसयिकांनी शनिवारी (ता. ३१) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

लग्नसराई संपत येऊनही बँड मात्र यंदा वाजलेच नाही
लग्नसराई संपत येऊनही बँड मात्र यंदा वाजलेच नाही. ऐन लग्नसराई सुरू होण्यापासून बंद असलेला हा व्यवसाय आता लग्नसराईत बंद आहे. आगामी काळात बँड सुरू होण्याचे कोणतेच संकेत दिसत नाहीत. एक लग्नसराईचा हंगाम लॉकडाउनमध्ये गेला असताना दुसऱ्या हंगामातही वेगळे चित्र नाही. त्यामुळे बँड पथकातील लोकांची उपासमार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बँड असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष रझाक शेख तथा शेख मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात, सर्व व्यवसाय आता सुरू होत आहेत. मात्र, बँड पार्टी सुरू होत नाही. लग्न समारंभात केवळ ५० लोकांना परवानगी असल्याने कुणी वाजंत्री लावत नाही.

बँडपथक सुरू नसल्याची खंत, कुटुंबाची उपासमार 

नाशिक जिल्ह्यात छोटे-मोठे ४०० ते ५०० बँडपथक असून, आजमितीस ते सर्व बंद आहेत. त्यातील किमान दोन हजारांवर कामगारांना रोजगार नाही. त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. शहरात आणि ग्रामीण भागातही सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम व समारंभ, सोहळे बंद आहेत. लग्न या संस्थेभोवती जे इतर घटक आहेत, त्यातील मंगल कार्यालय, केटरर्स, मंडप, साउंड सिस्टिम, डेकोरेशन, फोटोग्राफी, पौरोहित्य हे सर्व सुरू आहे. मात्र बँडपथक सुरू नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT