Garbage dumped under the flyover  esakal
नाशिक

Nashik News : मालेगावला उड्डाणपूल तळ बनले कचऱ्याचे आगार; महापालिकेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या भागात रहदारीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

यातच उड्डाणपुलाच्या खाली परिसरातील व्यावसायिक व रहिवासी कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचरा महापालिकेकडून उचलला जात नसल्याने उड्डाणपुलाचे तळ जणू कचऱ्याचे आगार झाले आहे. (base of flyover become like garbage dump malegaon nashik news)

मालेगाव शहरात पाच ते सहा वर्षापासून उड्डाणपुलाचे काम रखडले होते. सहा महिन्यापूर्वी कामाला सुरवात झाली. मात्र हे काम कासवगतीने सुरु आहे. पूल उभारण्यासाठी लोखंडी पिलर्स उभारले आहेत.

त्या पिलर्सच्या खालीच स्थानिक रहिवासी व व्यावसायिक यांच्याकडून सातत्याने कचरा टाकला जात असल्याने आणि महापालिकेकडून हा कचरा नियमित उचलला जात नसल्याने हा परिसर कचऱ्याचे आगारच बनत चालले आहे.

परिसरात खानावळ, बर्फी, हॉटेल्स यासह विविध दुकाने आहेत. उड्डाणपुलाच्या सुमोर उत्तर व दक्षिणेला मोठ्या प्रमाणात घरे असून त्या घरातील कचरा नागरिक उड्डाण पुलाच्या खाली टाकतात. त्या कचऱ्यात प्रामुख्याने प्लॅस्टिक पिशवी, चारा व हॉटेलमधील घाण तेथेच टाकतात. गेल्या वर्षभरापासून तिथे घाण पडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिसरात दुर्गंधी व डासांचे साम्राज्य वाढले आहे. उड्डाण पुलाच्या दक्षिणेस असलेल्या तैयबा इमारतीजवळील गटार प्लॅस्टिक कचऱ्याने तुडूंब भरली आहे. या गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. सर्व पाणी रस्त्यावर येते. त्या पाठोपाठ कुसुंबा रस्त्यावरील सुन्नीपुरा भागात मुख्य गटारही कचऱ्याने पूर्ण भरली असून नळाला पाणी आल्यास या भागात गटारीचे पाणी मोहल्ल्यात शिरते.

गल्लीत ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा सामना करावा लागता. महापालिकेतर्फे शहरात सर्व गटारींची स्वच्छता करावी, कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महापालिकेतर्फे कारवाई करावी. उड्डाण पुलाखाली स्वच्छता करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

"वॉर्ड क्रमांक सहा व सात येथे रोज घंटागाडी येत नाही. नागरिकांना नाइलाजाने कचरा उड्डाणपुलाच्या खाली टाकावा लागतो. माजी नगरसेवकांना फोन केल्यानंतर देखील संबंधित प्रशासनाकडून कचरा उचलला जात नाही." - इरफान अहमद शफीक अहमद आग्रा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी सदस्य, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Fifty: पोराने पुन्हा कमाल केली! वैभवची षटकार खेचून फिफ्टी... शमीला सलाम अन् प्रतिस्पर्धींना फोडला घाम

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : मुंबईत जायला सुरुवात करा, मराठा मुंबईत आल्याचं कोणाला समजलं समजलं नाही पाहिजे - मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT