नाशिक : पंचवटी जुना गावठाण भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले वास्तव्यास असल्याने साहजिकच भाजपचे तीनही जागा निवडून आणणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून विजयासाठी आसुसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा यश मिळाले नाही तर कायमस्वरूपी गाशा गुंडाळावा लागेल, अशी परिस्थिती आहे.
शंभर टक्के नाशिककर असलेल्या पंचवटी गावठाण भाग यंदा उत्तरेच्या भागापासून दूर करण्यात आला आहे. त्यामुळे गावठाणातील नागरिकांनाच प्रभागाच्या पालकाचा निर्णय घ्यायचा आहे. या प्रभागाचे वैशिष्ट म्हणजे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. ढिकले यांचे वास्तव्य आहे. स्व. उत्तमराव ढिकले यांच्यापासून ते आता विद्यमान आमदारापर्यंत ते जे ठरवतील तो उमेदवार निवडून येईल, असे आतापर्यंतचे गणित आहे. प्रत्येकवेळी ढिकले यांनी स्वतःकडे सत्ता ठेवली नाही. स्वतःच्या नावावर इतरांनाही त्यांनी संधी देताना सर्वसमावेशक राजकारण केले आहे. त्यामुळे यंदाही आमदार ढिकले यांचा शब्दच अंतिम राहणार आहे. संपूर्ण गावठाण असलेल्या या भागात राष्ट्रवादी विजयासाठी अनेक वर्षांपासून धडपड करत आहे. यंदा मोठी ताकद लावली जाणार आहे. यंदा यश पदरात न पडल्यास गाशा गुंडाळावा लागेल, अशी स्थिती आहे.
प्रभागाची व्याप्ती
कपालेश्वर मंदिर, सरदार चौक, काळाराम मंदिर, नागचौक, पाथरवट लेन, सिता गुंफा परिसर, इंदिरा गांधी हॉस्पिटल, राजवाडा, श्रीराम विद्यालय, आर. पी. विद्यालय, वाल्मीकनगर, संजयनगर , बाप्पा सीतारामनगर, विजयनगर, फॉरेंसिक लॅब, भिकुसा पेपर मिल.
उत्तर : दिंडोरी रोड व कॅनॉल जंक्शनपासून कॅनॉल हद्दीने पूर्वेकडून दक्षिणेकडे हिरावाडी रोड चौक, पुढे लाटेनगर रस्त्याने पूर्वेकडून कमलनगर चौकापर्यंत.
पूर्व : कमलनगर चौकापासून दक्षिणेकडून स्व. मीनाताई ठाकरे स्टेडिअम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनपर्यंत.
दक्षिण : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडिअमपासून महामार्ग हद्दीने दक्षिणेकडून उत्तरेकडे जुना आडगाव नाक्यापर्यंत. पुढे जुन्या राष्ट्रीय महामार्गाकडून उत्तरेकडील भाग घेऊन काट्या मारुती चौकापर्यंत, पंचवटी अमरधाम रोडने अमरधामपर्यंत.
पश्चिम : पंचवटी अमरधामपासून गोदावरी नदी हद्दीने उत्तरेकडून गंगा-गोदावरी मंदिरापर्यंत. पूर्वेस कपालेश्वर मंदिरापासून खांदवे सभागृह, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, निमाणी बंगला, आर. पी. विद्यालय.
हे आहेत इच्छुक
भाजप : हेमंत शेट्टी, रूपाली गावंड-शेट्टी, उल्हास धनवटे, जयश्री धनवटे, सतनाम राजपूत, प्रवीण भाटे, मनीषा भाटे, दिगंबर धुमाळ, चंद्रकला धुमाळ, चंद्रशेखर पंचाक्षरी, वैशाली पंचाक्षरी, महेश महंकाळे, संजय संघवी, प्रणव शिंदे, जुई शिंदे, शंतनू शिंदे, अनिल वाघ.
शिवसेना : गुलाब भोये, भगवान भोगे, रीमा भोगे, सचिन टिळे, रूपेश पालकर, शैलेश सूर्यवंशी, निर्मला कांबळे
राष्ट्रवादी : समाधान जाधव, शरद कोशिरे, अंबादास खैरे, संजय टिळे, उमेश कोठुळे, रामेश्वर साबळे
काँग्रेस : शरद आहेर, कल्पना पांडे
मनसे : नरेश ऊर्फ बापू भोंगे, संदीप भवर, सचिन आढळकर
इतर : दीपक चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.