Beating of workers by manager in fab industries nashik marathi news 
नाशिक

 फैब कंपनीत व्यवस्थापकाकडून कामगारांना बेदम मारहाण   

के.टी.राजोळे.

नाशिक/वाडीव-हे : औद्योगीक वसाहतीतील फैब इंडस्ट्रीज प्रा.ली.कंपनीत कामगारांनी यूनियन स्थापन केल्याचा राग मनात धरुन कंपनी व्यवस्थापकाने सुरक्षारक्षक (बाउंसर)यांना सोबत घेत कामगारांना बेदम मारहाण केली असल्याची तक्रार वाडीव-हे पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय घडला?

याबाबत अधिक माहिती अशी की वाडीव-हे येथील फैब कंपनी मध्ये कामगारांना कायम करणे, किमान वेतन व इतर सवलती मिळण्यासाठी कामगारांनी सीटू संघटनेचे सभासद होत या ठिकाणी सीटू संघटनेची स्थापना केली. मात्र कामगारांनी कोणताही संप न पुकारता काम सुरुच ठेवले होते,असे असतांना कंपनी प्रशासनाने परप्रांतीय कामगारांची भर्ती सुरु केली याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापक सचिन चाफेकर यांनी सुरक्षा रक्षकांना सोबत घेवून तीन कामगारांचा मोबाइल फेकून देत शिवगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली.

गुन्हा दाखल 

या बाबत कामगार प्रकाश देवराम गायकर रा. मुकने याने वाडीव-हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ समाज मध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने या बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सदर कंपनी व्यावस्थपकावर कड़क कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे तसेच याबाबत सीटू संघटना आणि छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनीही कामगारांच्या या प्रश्नावर आवाज उठविला असून करवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT