corona medical team.jpg 
नाशिक

धक्कादायक! कोरोना बाधित रुग्णाकडून वैद्यकीय पथकास मारहाण...तपासणीसाठी घरी गेलेल्या पथकाला शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : १४ दिवसांनी रुग्णांची नियमित तपासणी (रुटिंग चेकअप) स्थानिक वैद्यकीय पथकामार्फत केले जाते. ती करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत आरोग्य सेविका व आशा कर्मचारी यांचे पथक गेले असता त्या ठिकाणी त्या रुग्णाची आई कुठे आहे? अशी विचारणा केली असता संबंधित रुग्णाने त्या पथकास उडवाउडवीची उत्तरे देऊन आरडा-ओरडा केला..तसेच त्यांच्या सोबत केला धक्कादायक प्रकार..

असा घडला धक्कादायक प्रकार

कोरोना बाधित रुग्णाच्या घरी नियमित तपासणी साठी गेलेल्या वैद्यकीय पथकास मारहाण करून त्यांना कामापासून परावृत्त केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. नाशिक शहरात कोरोना बाधीत व्यक्तींवर नाशिक महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना घरी सोडल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व रुग्णांची नियमित तपासणी (रुटिंग चेकअप) परिसरातील नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाकडून केली जात असते. पंचशील नगर रघुकुल सोसायटी येथील ४८वर्षीय रहिवाशी दि.२३ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आलेला होता. त्याच्या बरोबर त्याच्या कुटुंबातील आई,पत्नी, मुलगी व मुलगा यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते.

पथकास उडवाउडवीची उत्तरे देऊन आरडा-ओरडा

त्यानंतर १४ दिवसांनी रुग्णांची नियमित तपासणी (रुटिंग चेकअप) स्थानिक वैद्यकीय पथकामार्फत केले जाते ती नियमित तपासणी (रुटिंग चेकअप) करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत आरोग्य सेविका व आशा कर्मचारी यांचे पथक गेले असता त्या ठिकाणी त्या रुग्णाची आई कुठे आहे? अशी विचारणा केली असता संबंधित रुग्णाने त्या पथकास उडवाउडवीची उत्तरे देऊन आरडा-ओरडा केला व परत परत तपासणीसाठी येऊ नका असे म्हणत जबरदस्तीने घराबाहेर काढून पथकाला शिवीगाळ करीत मारहाण करून शासकीय कामापासून परावृत्त केले.

भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणी पथकातील वैद्यकीय अधिकारी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात असून ही तपासणी सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्या वैद्यकीय पथकास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT