lamp of fire.jpg 
नाशिक

भावांनो.. दिवा लावायचा होता कशासाठी? उत्स्फूर्त नागरिकांच्या कारनाम्यामुळे आले नाकेनऊ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : राणेनगरमध्ये पेटता दिवा पडल्याने कचरा व गवताला आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार काही उत्स्फूर्त नागरिकांनी चक्क आकाशात दिवे सोडले. त्यानंतर जो काही प्रकार घडला त्याने सगळ्यांचाच संताप झाला.

असा घडला प्रकार

राणेनगर मैदानाच्या भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हवेतून आलेला पेटता दिवा पडल्याने कचऱ्याला आग लागली. ही आग पसरत असतानाच नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ हजर होत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.

"गो कोरोना गो, कोरोना गो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी (ता. 5) नाशिककरांनी उत्स्फूर्त साथ दिली. रात्री नऊला सहकुटुंब बाल्कनी, इमारतीच्या गच्चीवर येत दिव्यांचा लखलखाट केला. कोरोना विषाणू उच्चाटनाचा घोष या वेळी नाशिककरांनी केला. यापूर्वी टाळी व थाळी वाजविण्याच्या आवाहनालाही नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) रात्री नऊला दिवे, मोबाईलची टॉर्च लावत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यास नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यात अशा काही उत्साही नागरिकांकडून केलेल्या कारनामामुळे नाकेनाऊ मात्र आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT