PUC Rate Hike
PUC Rate Hike esakal
नाशिक

वाहन तपासणीत 15 ते 40 रुपयांपर्यंत वाढ; महागाईमुळे सुधारित नवे दर लागू

कुणाल संत

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात (fuel price hike) सातत्याने वाढ होत असल्याने महागाईने (Inflation) डोके वर काढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. महागाईची झळ सोसत असताना आता वाहनांची वायुप्रदुषण तपासणीच्या (PUC) दरामध्येदेखील प्रादेशिक परिवहन विभागाकडून (Department of Regional Transportation) वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरपत्रकांचे फलक दर्शनीय ठिकाणी लावावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे. (because of inflation Increased rates in vehicle inspection from Rs 15 to Rs 40 Nashik News)

राज्य शासनाच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची वायुप्रदुषण तपासणीचे सुधारित नवे दर लागू करण्यात आलेले आहे. या नव्या दरानुसार दुचाकी, तीनचाकी, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी गॅसवर चालणारे चारचाकी आणि डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांची पीयूसी काढण्यासाठी वाहनचालकांना आता अतिरिक्त १५ ते ४० रुपये मोजावे लागणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पीयूसी केंद्रावर सुधारित दरपत्रकांचे फलक दर्शनीय ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. पीयूसी केंद्रांकडून याबाबतची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तपासणी विशेष पथकामार्फत करण्यात येणार आहे, असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितले.

वाहनप्रकार सध्याचे दर (१६ मार्च २०२१ परिपत्रक) सुधारित दर २७ मे २०२२ परिपत्रक

दुचाकी ३५ ५०

तीनचाकी (पेट्रोल) ७० १००

चारचाकी (पेट्रोल/सीएनजी/एलपीजी) ९० १२५

डिझेल (चारचाकी) ११० १५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT