Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: ऑडिटर बनून आला; सव्वा लाख केले लंपास; मॅकडॉनल्डस्‌ रेस्टॉरंटला घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : नाशिक-पुणे रोडवरील मॅकडॉनल्ड रेस्टॉरंट येथे ऑडिटर असल्याची बतावणी करून भामट्याने सव्वा लाखांची रोकड घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Becomes an Auditor quarter of million banana lumpas McDonalds restaurant vandalized Nashik Crime)

याप्रकरणी रेस्टॉरंटचा व्यवस्थापक सौरभ संतोष शेट्टी (रा. लक्ष्मीनारायण हिल्स, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टी यांच्या फिर्यादीनुसार, पुणा रोडवरील विजय ममता थिएटरशेजारी मॅकडॉनल्डस्‌ रेस्टॉरंट आहे.

गेल्या सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक अनोळखी संशयित रेस्टॉरंटच्या काऊंटरवर आला आणि आपण ऑडिटर असल्याचे सांगितले. तसेच, दिवसभरातील आर्थिक व्यवहाराची माहिती विचारू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी काऊंटरवर व्यवस्थापक नसल्याने संशयिताने काऊंटरवरील व्यक्तीस गल्ल्यातील रक्कम वर काढण्यास सांगून व्यवस्थापकाला बोलाविण्यास पाठविले. ती संधी साधून संशयित भामट्याने काऊंटरवरील १ लाख २६ हजार २९३ रुपयांची रक्कम मोजण्याचा बहाणा करीत पोबारा केला.

व्यवस्थापक काऊंटरवर आला असता संशयित भामटा पैसे घेऊन पसार झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ उपनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक प्रविण चौधरी हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT